जबरदस्त! बाप- लेकीचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट व्हाल

सध्या बाप- लेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 9, 2022, 01:43 PM IST
जबरदस्त! बाप- लेकीचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट व्हाल title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) रोज अनेक पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. नेहमीच या पोस्ट किंवा व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. दरम्यान, नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या 'कबीर सिंग' (Kabir Singh)चित्रपटातील 'कैसे हुआ..' (Kaise Hua Song) हे गाणं एक छोटी मुलगी (Father And Daughter Video) आणि तिचे वडील गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे या व्हिडीओचीच चर्चा सुरु झाली आहे. 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांनी भीती पोटी हात जोडून केली 'ही' विनंती

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @blinking_hasi  या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ती छोटी मुलगी तिच्या वडिलांसोबत गाणं गात असल्याचे पाहायला मिळते. जेव्हा 'कैसे हुआ...' हे गाणं येताच ती मुलगी उत्साहात आवाजावर जोर देत मोठ्यानं किंचाळत गाणं गात आहे. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

व्हिडीओ पाहा -

या 35 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये वडील आणि त्यांची लेक बेडवर बसल्याचे दिसत आहे. गाण्याची सुरुवात वडील करतात... पण जेव्हा 'कैसे हुआ' ही लाइन येते तेव्हा ती मुलगी पूर्ण जोर लावून उत्साहानं कैसे हुआ गाऊ लागते. त्या मुलीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणालाही हसू अनावर होणार होईल. (Little Girl Singing Kabir Singh s Kaise Hua Song Win Internet Old Video Viral On Social Media) 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ 7 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला. व्हिडीओला 38 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे तर लाखो लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की या मुलीकडे सिंगिंग स्किल कोणाकडून आली आहे. काही नेटकऱ्यांनी कमेंट करत या व्हिडीओला सोशल मीडियावरील हिट व्हिडीओ अशी कमेंटही केली आहे.