Chandrayaan-3 Launch Countdown Live: भारतातून अतिशय ऐतिहासिक अशा चांद्रयान मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आज असून, अखेर असंख्य महत्त्वाकांक्षांच्या जोडीनं चांद्रयान 3 अवकाशात झेपावणार आहे. त्यामुळं फक्त भारतच नव्हे, तर संपूर्ण अंतराळ क्षेत्राची या मोहिमेवर नजर असणार आहे. इथं आपण या मोहिमेतील सविस्तर माहिती आणि थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहोत.
14 Jul 2023, 10:05 वाजता
Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 ही भारताची तिसरी चांद्रयान मोहीम आहे. दुसऱ्यांदा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डींगचा प्रयत्न करणार आहे. तसेच चंद्रयान-3 मधील रोव्हर चंद्रावर उतरवून तेथील माहिती मिळवण्याचा भारतीय शास्त्रज्ञांचा प्रयत्न असेल.
हेसुद्धा वाचा : ISRO च्या Chandrayaan-3 मोहिमेसाठी किती खर्च झाला माहितीये का?
14 Jul 2023, 09:26 वाजता
Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.
14 Jul 2023, 08:16 वाजता
Chandrayaan-3 Launch Countdown Live: सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.
14 Jul 2023, 07:59 वाजता
Chandrayaan-3 Launch Countdown Live: हे चांद्रयान देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटात उभं आहे. या लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर केला जात आहे.
14 Jul 2023, 07:51 वाजता
Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 ची लाँचिंगची तयारी पूर्ण झाली आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची रंगीत तालीमही पूर्ण झालीय आणि रंगीत तालीम 100 टक्के यशस्वी ठरलीय.
14 Jul 2023, 07:50 वाजता
Chandrayaan-3 Launch Countdown Live: श्रीहरीकोटामध्ये सर्वात महत्त्वाचं काऊंटडाऊन सुरू झालंय. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन हे प्रक्षेपण होणार आहे.
14 Jul 2023, 07:36 वाजता
Chandrayaan-3 Launch Countdown Live: प्रचंड मेहनत आणि प्रयत्नांनंतर अखेर शुक्रवारी 14 जुलै 2023 (आज) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 अंतराळात झेप घेणार आहे.
LVM3 M4/Chandrayaan-3 Mission:
Mission Readiness Review is completed.
The board has authorised the launch.
The countdown begins tomorrow.The launch can be viewed LIVE onhttps://t.co/5wOj8aimkHhttps://t.co/zugXQAY0c0https://t.co/u5b07tA9e5
DD National
from 14:00 Hrs. IST…— ISRO (@isro) July 12, 2023