Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणात दोन तासात बाजी पलटली, भाजपने बाजी मारली

Haryana Vidhan Sabha Election Results News in Marathi: हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज स्पष्ट झाले आहेत. भाजपची हॅट्रिक हुकली आहे तर काँग्रेसने मैदान मारलं आहे. 

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणात दोन तासात बाजी पलटली, भाजपने बाजी मारली

Haryana Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज 8 ऑक्टोबर रोजी होत आहे. सत्तारुढ भाजपा सत्ता कायम राखण्यास यशस्वी होणार की काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची सुरुवात झाली. यावेळी मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहिल्या एक तासांतच निवडणुकीचे कल स्पष्ट झाले असून काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. 

8 Oct 2024, 10:29 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणात दोन तासांत मोठा उलटफेर

हरियाणातील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. दोन तासांतच मोठा उलटफेर झाला असून भाजपने 46 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसची 37 जागांवर आघाडी. 

8 Oct 2024, 09:59 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणातील विनेश फोगाट आघाडीवर

हरियाणातील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. काँग्रेसच्या विनेश फोगाट या आघाडीवर आहेत.

8 Oct 2024, 09:56 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणातील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण

हरियाणातील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. भाजपने दमदार आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. 

8 Oct 2024, 09:49 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: काँग्रेसच्या जागा घटल्या, भाजपने घेतली आघाडी

हरियाणात सकाळी 9.50 च्या सुमारास हाती आलेल्या कलांनुसार भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे तर, काँग्रेसच्या जागा कमी होऊन 39 झाल्या आहेत. 

8 Oct 2024, 09:21 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणात भाकरी फिरली? भाजप काँग्रेसपेक्षा पुढे

हरियाणात सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला होता. काँग्रेसने 65 जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, आता दीड तासांच्या पिछाडीनंतर भाजपने आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस आता फक्त 41 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजपचे 44 जागांवर पुढे आहे. 

8 Oct 2024, 09:12 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणाचे कुरुक्षेत्र काँग्रेसने जिंकले, भाजपची हॅट्रिक हुकली

हरियाणात एक तासातंच निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाला आहे. सर्व 90 जागांचे कल हाती आले असून काँग्रेसने मैदान मारलं आहे. काँग्रेसने 67 जागांवर विजय मिळवला आहे तर, भाजपला 21 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर, इनेलो व अपक्ष यांच्या प्रत्येकी 1-1 जागा आल्या आहेत. 

8 Oct 2024, 09:11 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: पलवल जिल्ह्यातील सर्व जागांवर काँग्रेस

हरियाणातील पलवल जिल्ह्यातील सर्व तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर, करनाल येथीलही सर्व पाच जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

8 Oct 2024, 08:44 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: पलवल जिल्ह्यातील सर्व जागांवर काँग्रेस

हरियाणातील पलवल जिल्ह्यातील सर्व तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर, करनाल येथीलही सर्व पाच जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

8 Oct 2024, 08:33 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: सावित्री जिंदल आघाडीवर

अपक्ष उमेदवार सावित्री जिंदल हरियाणातील हिसार मतदारसंघातून आघाडीवर आहेत. भाजपने उमेदवारी न दिल्यामुळं सावित्री जिंदल यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता.

8 Oct 2024, 08:29 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: पहिल्या अर्धा तासातच काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला

हरियाणात 64 जागांचे कल हाती आले असून काँग्रेसने बहुमताचा टप्पा गाठला आहे. तर, काँग्रेस 47 जागांवर विजयी झाली असून 16 जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं आहे.