Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणात दोन तासात बाजी पलटली, भाजपने बाजी मारली

Haryana Vidhan Sabha Election Results News in Marathi: हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज स्पष्ट झाले आहेत. भाजपची हॅट्रिक हुकली आहे तर काँग्रेसने मैदान मारलं आहे. 

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणात दोन तासात बाजी पलटली, भाजपने बाजी मारली

Haryana Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज 8 ऑक्टोबर रोजी होत आहे. सत्तारुढ भाजपा सत्ता कायम राखण्यास यशस्वी होणार की काँग्रेस 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची सुरुवात झाली. यावेळी मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहिल्या एक तासांतच निवडणुकीचे कल स्पष्ट झाले असून काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. 

8 Oct 2024, 08:20 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर

सकाळी 8.30 च्या सुमारापर्यंत हरियाणातील 90 विधानसभा जागांपैकी 73 जागांचे कल समोर आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर तर भाजप 28 जागांवर विजयी झाली आहे. आयएनएलडी 2 जागांवर आघाडी घेतली आहे.

8 Oct 2024, 08:09 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: काँग्रेस भाजपपेक्षा दुप्पटीने पुढे; विनेश फोगाट आघाडीवर

जुलाना येथून विनेश फोगट आघाडीवर आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 12 जागांवर तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आले. 

8 Oct 2024, 08:04 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: मतमोजणीला सुरुवात

हरियाणात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजप 5 तर काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला आहे.

8 Oct 2024, 07:58 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: मतमोजणीला सुरुवात

हरियाणात मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात सुरुवातीचे कल हाती येणार आहेत. 

8 Oct 2024, 07:22 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: भाजपचं सरकार येणार; CM नायब सिंह सैनी यांचा दावा

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी निवडणुक निकालाच्या आधीच मोठा दावा केला आहे. राज्यात भाजपलाच बहुमत मिळणार असून सरकार आम्हीच बनवणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

8 Oct 2024, 07:12 वाजता

Haryana Vidhan Sabha Election Result LIVE: हरियाणात निवडणूक रिंगणात 1,031 उमेदवार 

हरियाणा विधानसभा निवडणुकांत 1,031 उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. त्यामध्ये 496 अपक्ष व 101 महिलांचा समावेश होता. राज्यात विधानसभा निवडणुकांत 67.90 टक्के मतदान झाले.