Harshvardhan Patil : भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतलीय.. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय.. भव्यदिव्य सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांनी पक्षात प्रवेश केलाय.. यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या खुलाश्यामुळे माहाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंच्या विजयात अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटलांनी केलाय. इंदापूरच्या सभेत बोलतना हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिलीय. सुप्रिया सुळे 3 वेळा खासदार झाल्या तेव्हाही सहभाग होता आणि या लोकसभेतही अदृश्य सहभाग होता, असं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलंय. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार पक्षात देतील ती जबाबदारी पार पाडणार असल्याचं म्हटंलंय.
शरद पवारांनी इंदापूरच्या सभेत मोठं विधान केलंय.. 14 तारखेला फलटण ला कार्यक्रम आहे. जो कार्यक्रम इथे तोच कार्यक्रम तिथे होणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत शरद पवारांनी इंदापुरात दिलेत.. त्यामुळे हर्षवर्धन पाटलानंतर रामराजे निंबाळकरांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होणार असल्याचे संकेत पवारांनी दिलेत.. दरम्यान अजित पवार आज साता-याच्या दौ-यावर आहेत. मात्र या कार्यक्रमांना रामराजे नाईक निंबाळकर गैरहजर आहेत.
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी हातातील फलक उंचावत दत्तात्रय भरणेंना डिवचलं.. मलिदा गॅंग हटवा हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा.. बाप तो बाप रहेगा.. अशा आशयाचे बॅनर भर सभेत उंचावले. इंदापूरला मलिदा घेऊन कामे वाटणारा आमदार नको.. असे देखिल बॅनर झळकवले..
शिरूर मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेला उभे राहणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगत आहे. त्यावर इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला आलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली. शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा मतदारसंघ खूप फेमस असून, आमदार अशोक पवार यांचा सत्कार करा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.