Karnataka Assembly Election 2023 Updates : कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरु होणार असून, ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. निवडणुकीनंतर 13 मे रोजी मतमोजणी होणार असून, त्यानंतर कर्नाटकात कोणाचे सरकार बनणार आहे, हे कळेल. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शेवटपर्यंत सत्ताधारी भाजपच्या बाजूने प्रचार केला. त्याचबरोबर काँग्रेस आणि जेडीएसनेही निवडणूक प्रचारात पूर्ण ताकद लावली.
10 May 2023, 10:15 वाजता
लग्नाआधी वधूने बजावला मतदान
Karnataka Assembly Election 2023 Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत वधूने मतदान केले. चिक्कमगलुरु येथे मतदान सुरु आहे. मुदिगेरे बूथ क्रमांक 65, मकोनहल्ली येथे एका वधूने लग्नाआधी आपला मतदानाचा हक्क बजावला. ती येथील केंद्रावर दाखल झाली होती.
10 May 2023, 10:13 वाजता
सुधा मूर्ती यांनी केले मतदान
Karnataka Assembly Election 2023 Updates : लेखिका सुधा मूर्ती यांनी बेंगळुरुमधील जयनगरमध्ये मतदान केले. त्या म्हणाल्या, "मतदान करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. मतदान करणे हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे, कोणत्याही लोकशाहीत मतदार नसतील तर ती लोकशाही नसते, त्यामुळे मी सर्वांना मतदान करण्याची विनंती करते."
10 May 2023, 08:35 वाजता
'काँग्रेसचा विजय होणार'
Karnataka Assembly Election 2023 Updates : कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खांद्रे यांनी बिदरच्या भालकी भागात मतदान केले. काँग्रेसचा विजय होईल, असा त्यांनी दावा केला आहे.
Eshwar Khandre, working president of Karnataka Congress, casts his vote in Bidar's Bhalki area #KarnatakaElections pic.twitter.com/Ti1xBFaTcO
— ANI (@ANI) May 10, 2023
10 May 2023, 08:32 वाजता
भाजपला बहुमत मिळेल - येडियुरप्पा
Karnataka Assembly Election 2023 Updates : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, 'भाजपला बुहमत मिळेल. मी कर्नाटकातील सर्व जनतेला लवकरात लवकर मतदान करण्याची विनंती करत आहे. मला खात्री आहे की ते भाजपला मतदान करतील. विजयेंद्र यांना 40 हजारांहून अधिक मते मिळतील आणि ते विजयी होतील.
#WATCH | "BY Vijayendra is going to get more than 40,000 votes here. We will get the absolute majority and will form the govt, there is no doubt about it. People's response is very good," says Former Karnataka CM and senior BJP leader BS Yediyurappa after casting his vote… pic.twitter.com/Gcy7vwjJKx
— ANI (@ANI) May 10, 2023
10 May 2023, 08:29 वाजता
जातीय राजकारणाविरोधात मतदान - प्रकाश राज
Karnataka Assembly Election 2023 Updates : बंगळुरुमध्ये मतदान केल्यानंतर अभिनेते प्रकाश राज म्हणाले, जातीय राजकारणाविरोधात मतदान करायचे आहे. निवडणूक ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपल्याला कर्नाटक सुंदर बनवायचे आहे. सुसंवाद राखावा लागेल.
#WATCH | "We've to vote against communal politics. We need Karnataka to be beautiful," says Actor Prakash Raj after casting his vote for #KarnatakaAssemblyElection pic.twitter.com/bvVgTgeetP
— ANI (@ANI) May 10, 2023
10 May 2023, 08:27 वाजता
अर्थमंत्री सीतारामन यांनी केले मतदान
Karnataka Assembly Election 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्या. बेंगळुरूमधील विजय नगर येथे त्यांनी मतदान केले.
#WATCH | Infosys founder Narayana Murthy arrives at a polling booth in Bengaluru to cast his vote.#KarnatakaElections pic.twitter.com/uhQv2RMUVU
— ANI (@ANI) May 10, 2023
10 May 2023, 07:30 वाजता
संवेदनशील केंद्रांवर अधिक सुरक्षा व्यवस्था
Karnataka Assembly Election 2023 Updates : 1.5 लाख ईव्हीएम वापरण्यात येणार आहेत. कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा आहेत. यासाठी 2615 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी राज्यात 58 हजार 545 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, या ठिकाणी एकूण 5 कोटी 31 लाख 33 हजार 054 मतदार मतदान करणार आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण 75 हजार 603 बॅलेट युनिट (BU), 70 हजार 300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76,202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी राज्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक ड्युटीसाठी शेजारील राज्यातून सुरक्षा दलांनाही राज्यात पाचारण करण्यात आले आहे.
10 May 2023, 07:29 वाजता
संवेदनशील केंद्रांवर अधिक सुरक्षा व्यवस्था
Karnataka Assembly Election 2023 Updates : कर्नाटकातील अत्यंत संवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही बसवलेत. यासोबतच तेथे सुरक्षा दलांची संख्याही वाढवण्यात आली आहे.
10 May 2023, 07:28 वाजता
Karnataka Assembly Election 2023 Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानापूर्वी व्हिडिओ संदेश जारी केला. मतदानापूर्वी पीएम मोदींनी व्हिडिओ मेसेज जारी करत म्हटले की, 'कर्नाटकच्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्न हे माझे स्वप्न आहे. तुमचा संकल्प हाच माझा संकल्प आहे. जर आपण एकत्र आलो आणि आपले लक्ष एका ध्येयाकडे केंद्रित केले तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही.
10 May 2023, 07:26 वाजता
काँग्रेसचे मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Karnataka Assembly Election 2023 Updates : काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडिओ संदेशाने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आयोगाला पाठवलेल्या तक्रारीत त्यांनी गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कथित आक्षेपार्ह विधानांचा मुद्दाही उपस्थित केला आहे.