Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : प्रभू श्रीराम यांच्या नगरीमध्ये अर्थात अयोध्येमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण वातावरण राममय झालं असून, तिथं कणाकणात रामाचा वावर जाणवत आहे. निमित्त आहे ते म्हणजे बहुप्रतिक्षित राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं.
सोमवारी, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत (Ram lala Pran Pratishtha) पार पडणार आहे. अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे. अशा या सोहळ्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना? या सोहळ्यादरम्यान अयोध्येतील सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथं मिळणार आहेत. (Ram Mandir Inaugration)
22 Jan 2024, 14:51 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : राम उपाय आहे, वाद नाही - पंतप्रधान मोदी
'प्रत्येक युगात लोकांनी राम जगला आहे. प्रत्येक युगात लोकांनी आपापल्या परीने राम त्यांच्या शब्दात व्यक्त केला आहे. हा रामरस जीवनाच्या प्रवाहासारखा अखंड वाहतो. राम अग्नी नसून ऊर्जा आहे. राम उपाय आहे, वाद नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
22 Jan 2024, 14:44 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : न्यायव्यवस्थेने न्यायाचा सन्मान राखला - पंतप्रधान मोदी
आमच्या अनेक पिढ्या रामापासून विभक्त झाल्या आहेत. आपल्या संविधानाच्या पहिल्या प्रतिमध्येही राम आहे. न्यायाची प्रतिष्ठा जपणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. न्यायाला समानार्थी असलेले प्रभू रामाचे मंदिरही न्याय्य पद्धतीने बांधले गेले. आज प्रत्येक गावात कीर्तन होत आहे. मंदिरांमध्ये उत्सव होत आहेत. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी घरोघरी रामज्योती लावण्याची तयारी सुरू आहे.
22 Jan 2024, 14:41 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : आज आमचा राम आला आहे - पंतप्रधान मोदी
'आमचा रामलला आता तंबूत राहणार नाही. आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. आज आमचा राम आला आहे. आज आपल्याला श्री रामाचे मंदिर सापडले आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून राष्ट्र उभे राहिले आहे. ही वेळ सामान्य नाही. प्रदीर्घ वियोगामुळे आलेला त्रास आता संपला आहे. प्रदीर्घ वियोगामुळे आलेला त्रास आता संपला आहे. राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून कायदेशीर लढाई लढली गेली,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
22 Jan 2024, 14:22 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : मी या क्षणी दैवी अनुभव घेतोय- पंतप्रधान मोदी
'ज्या महान हस्तींमुळं हे दीव्य कार्य घडलं, त्यांचा सहवास मला जाणवतोय. मी प्रभू श्रीराम यांच्यापुढं नसमस्तक होतो. त्यांच्यापुढं क्षमायाचनाही करत आहे. पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येमध्ये राहिलेल्या काही त्रुटी राहिल्या असतील, कारण इतक्या पिढ्यांपर्यंत हे काम करता आलं नाही, पण आज मात्र ती उणीवही भरून निघाली आहे. मला विश्वास आहे की श्रीराम आपल्याला नक्कीच क्षमा करतील', असं म्हणत आपल्या दैवी अनुभवांचं कथन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
22 Jan 2024, 14:16 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : अखेर तो क्षण आला... म्हणताना पंतप्रधान भावूक
गर्भगृहातील अनुभवाचं कथन करत असताना मोठ्या जनसमुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. माझं शरीर अजूनही स्पंदीत असून, चित्त प्राणप्रतिष्ठेच्याच क्षणात लीन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता रामलल्ला तंबूत राहणार नाहीत, असं म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
#WATCH | Prime Minister Narendra Modi addresses people after the ‘Pran Pratishtha’ ceremony at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya. #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/ugAIrpDCM5
— ANI (@ANI) January 22, 2024
22 Jan 2024, 13:46 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 11 दिवसांचं अनुष्ठान सफल संपूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या कारणास्तव 11 दिवसांचं अनुष्ठान ठेवलं आणि अखेर त्यांचा हा संकल्प सिद्धीस गेल्यानंतर रामाच्याच भूमीत त्यांनी हे अनुष्ठान महंतांच्या हस्ते जल ग्रहण करत पूर्णत्वास नेलं.
22 Jan 2024, 13:20 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : माता कौशल्येनं दिलेलं खास नाव...
माता कौशल्येनं रामलल्लाला दिलेल्या राघव या नावासह पाच वर्षांच्या बालरुपात रामलल्ला अयोध्येतील आपल्या जन्म भूमीत उभारण्यात आलेल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
22 Jan 2024, 13:10 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : मंगल भवन अमंगल हारी...
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रामलल्लांना साष्टांग दंडवत; प्राणप्रतिष्ठेनंतरच्या विधींदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी रामाच्या सुरेख मूर्तीपुढं साष्टांग दंडवत घातला.
#WATCH | PM Modi performs 'Dandavat Pranam' at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya. #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/kAw0eNjXRb
— ANI (@ANI) January 22, 2024
22 Jan 2024, 13:04 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : श्री राम चंद्र कृपालु भजमन...
श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्। नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्। अशा रामस्तुतीच्या स्वरांनी फक्त अयोध्याच नव्हे देशही दुमदुमला...
22 Jan 2024, 12:59 वाजता
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रामलल्लाची पहिली आरती..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची पहिली आरती संपन्न झाली. यावेळी मंदिर परिसरात एकच उत्साह पाहायला मिळाला.
#WATCH | 'Aarti' of Ram Lalla idol underway at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/fEmJlKsDsF
— ANI (@ANI) January 22, 2024