Ram Mandir Inauguration LIVE : 'राम आग नाही उर्जा, वाद नाही उपाय आहे'; प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणाले पंतप्रधान मोदी

Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येतील राम मंदिर उभारणीनंतर आता तो क्षण नजीक आला असून, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे.   

Ram Mandir Inauguration LIVE : 'राम आग नाही उर्जा, वाद नाही उपाय आहे'; प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणाले पंतप्रधान मोदी

Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : प्रभू श्रीराम यांच्या नगरीमध्ये अर्थात अयोध्येमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण वातावरण राममय झालं असून, तिथं कणाकणात रामाचा वावर जाणवत आहे. निमित्त आहे ते म्हणजे बहुप्रतिक्षित राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं. 

सोमवारी, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत (Ram lala Pran Pratishtha) पार पडणार आहे. अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे. अशा या सोहळ्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना? या सोहळ्यादरम्यान अयोध्येतील सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथं मिळणार आहेत.  (Ram Mandir Inaugration) 

22 Jan 2024, 12:44 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रघुपती राघव राजाराम... 

रघुपती राघव राजाराम.. च्या भजनानं अयोध्येतील वातावरण अतिशय मंगलमय झालं असून, मंदिरात श्रीरामचरणी पंतप्रधान मोदी श्रद्धासुमनं अर्पण करताना दिसत आहेत. 

22 Jan 2024, 12:35 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : शंखनाद आणि घंटानादानं अयोध्या दुमदुमली 

पायो जी मैनै राम रतन धन पायो... अशा मंगल स्वरांच्या माध्यमातून रामलल्लांची पहिली झलक संपूर्ण जगानं पाहिली. सनई चौघडे आणि शंखानादानं अयोध्येत रामनामाचा गजर केला आणि रोमहर्षक वातावरणानं सारेच भारावले. 

22 Jan 2024, 12:22 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : परम योग... 

इंद्र, आनंद, सर्वार्थ सिद्धी अशा पंचबान न झाल्यामुळं एक अदभूत योग तयार झाला असून, त्याच मुहूर्तावर राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. प्राणप्रतिष्ठा विधीसाठी राम मंदिरातील गर्भगृहात सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान मोदी, आनंदीबेन पटेल, योदी आदित्यनाथ यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. 

22 Jan 2024, 12:19 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : तपस्वी... 

गेल्या 11 दिवसांपासून एका योगी, तपस्वीप्रमाणं पंतप्रधान मोदी यांनी ध्यानधारणा केली असून, आज ते रामलल्लांपुढं नतमस्तक होताना दिसत आहेत. 

22 Jan 2024, 12:10 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात दाखल झाले असून, यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर असणारी प्रफुल्लित मुद्रा पाहण्याजोगी होती. 

22 Jan 2024, 11:48 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान होताच मूर्तीकार म्हणतात... 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिर परिसरात दाखल झालेल्या योगीराज यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, 'सध्या मला मी स्वत: या विश्वातील सर्वात नशिबवान व्यक्ती असल्यासारखं वाटत आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये मला माझ्या पूर्वजांचा, माझ्या कुटुंबीयांचा आशीर्वाद मिळाला आहे. रामलल्लांची मूर्ती साकारल्याचं वास्तव पाहतो तेव्हा मला मी स्वप्ननगरीतच असल्याचा भास होतो.'

हेसुद्धा वाचा : Ram Mandir Inauguration : 'मी विश्वातला सर्वात नशीबवान माणूस'; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराचा मन:स्पर्शी Video 

22 Jan 2024, 11:37 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : थेट प्रक्षेपणावर बंदी घालता येणार नाही 

फक्त इतर समुदायाचे लोक एखाद्या परिसरात राहतात म्हणून तिथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यावर निर्बंध घालता येणार नाहीत असे थेट आदेश सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडू सरकारला दिले आहेत.  राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. 

22 Jan 2024, 11:31 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : सुरेल नजराणा 

गायक सोनू निगम यानं अयोध्येतील भक्तिमय वातावरणाशी एकरुप होत सादर केलं गीत... 

22 Jan 2024, 11:20 वाजता

22 Jan 2024, 11:13 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : सरसंघचालक अयोध्येत 

सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल झाले असून, त्यांनी उपस्थितांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. साऊथ सुपरस्टार रजनीकांतही अयोध्येत दाखल झाले. रजनीकांत यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. रजनीकांत प्रवेशद्वारापाशी येताच त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी काहीशी गर्दी झाली.