Ram Mandir Inauguration LIVE : 'राम आग नाही उर्जा, वाद नाही उपाय आहे'; प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणाले पंतप्रधान मोदी

Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येतील राम मंदिर उभारणीनंतर आता तो क्षण नजीक आला असून, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे.   

Ram Mandir Inauguration LIVE : 'राम आग नाही उर्जा, वाद नाही उपाय आहे'; प्राणप्रतिष्ठेनंतर म्हणाले पंतप्रधान मोदी

Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : प्रभू श्रीराम यांच्या नगरीमध्ये अर्थात अयोध्येमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण वातावरण राममय झालं असून, तिथं कणाकणात रामाचा वावर जाणवत आहे. निमित्त आहे ते म्हणजे बहुप्रतिक्षित राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं. 

सोमवारी, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत (Ram lala Pran Pratishtha) पार पडणार आहे. अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे. अशा या सोहळ्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना? या सोहळ्यादरम्यान अयोध्येतील सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथं मिळणार आहेत.  (Ram Mandir Inaugration) 

22 Jan 2024, 07:03 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : कसा असेल प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि कार्यक्रम? 

सोमवारी पहाटेपासून राम मंदिरात मंगलध्वनी निनादण्यास सुरुवाच होणार आहे. किंबहुना ही सुरुवात झाली असून, विविध राज्यांमधील मंगल वाद्यांचा त्यासाठी वापर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होणार असून, मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी दूर केल्यानंतर रामलल्ला आरशामध्ये स्वत:चं रुप न्याहाळतील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान आचार्यांच्या हस्ते पूजाविधी संपन्न होईल. यावेळी गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत इतर 5 जणांची उपस्थिती असेल. अभिजीत मुहूर्तामध्ये राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. 

22 Jan 2024, 06:55 वाजता

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : मंदिराला फुलांची सुंदर सजावट

राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं अयोध्येतील मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी तब्बल 2 हजार 500 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला असून, दिल्ली कोलकाता इथूनच नव्हेतर थेट थायलंड आणि अर्जेंटिनामधूनही मंदिरासाठी फुलं आणली आहेत.  गुजरातमधील माळी समाजानंही मंदिरासाठी 300 क्विंटल फुलं भेट दिली आहेत. 

हेसुद्धा पाहा : रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या मंदिरात 250000 किलो फुलांनी सजावट; हे Photos पाहाच