Assembly Elections 2023: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. दरम्यान त्याआधी एक्झिट पोलमधून कोणत्या राज्यात कोणाला सत्ता मिळेल याचे अंदाज लावले जात आहेत. यावरुनच 2024 लोकसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या सेमी-फायनलमध्ये नेमकं कोणाचं पारडं जड आहे हेदेखील स्पष्ट होईल.
30 Nov 2023, 19:27 वाजता
राजस्थानमध्येही भाजपाला धक्का बसणार
राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला 199 विधानसभा जागांसाठी 75.45 टक्के मतदान झालं. 2018 मध्ये इथं 74.71 टक्के मतदान झालं होतं. राजस्थानमध्ये कोणाची सत्ता येणार याचा फैसला 3 डिसेंबरला येणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे अकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असणार आहे. भाजपाला 41 तर काँग्रेसला 42 टक्के जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
30 Nov 2023, 18:31 वाजता
30 Nov 2023, 18:24 वाजता
छत्तीसगड - एकूण 90 जागा
एक्सिस माय इंडिया
भाजप – 36-46, काँग्रेस – 40-50, इतर 01-05
पोलस्टार्ट
भाजप – 35-45, काँग्रेस – 40-50, इतर 00-03
सीव्होटर
भाजप – 36-48, काँग्रेस – 41-53, इतर 00-04
सीएनएक्स
भाजप – 30-40, काँग्रेस – 46-56, इतर 03-05
30 Nov 2023, 18:10 वाजता
Assembly Election Exit Poll
मध्यप्रदेशमध्ये एक्झीटपोलचा कल काँग्रेसकडे
1) झी न्यूज एक्झिट पोल
काँग्रेस – 111-121 भाजप – 106-116
2) पोल स्टेट एक्झिट पोल
काँग्रेस – 111-121 आणि भाजप – 106-116
3 ) मॅटराईस
काँग्रेस – 97-107, भाजप – 118-130
30 Nov 2023, 18:03 वाजता
Assembly Election Exit Poll
मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार
रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार कायम राहिल. मध्य प्रदेशमध्ये भाजपला 118 ते 130 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला 97 ते 107 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलस्टार्टच्या अंदाजानुसार मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असेल. भाजपाला 106-116 जागा तर काँग्रेसला 111-121 जागा मिळण्याची शक्यता आहे.
30 Nov 2023, 17:53 वाजता
30 Nov 2023, 17:45 वाजता
छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती?
छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात जबरदस्त चुरस आहे. एक्झीटपोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपाला 30-40 जागा मिळतील. तर काँग्रेसला 46-56 जागा मिळण्याची शक्यता आहे. आपला इथं खातही खोलता येणार नाही.तर इतर ०-6 जागा मिळतील. म्हणजे छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती असणार आहेत. छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 71 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला 14 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
30 Nov 2023, 17:05 वाजता
तेलंगणात कोणामध्ये संघर्ष?
तेलंगणात मुख्य लढत केसीआर यांचा पक्ष बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. ओवेसींच्या पक्षाचाही हा बालेकिल्ला आहे. ओवेसींचा पक्ष एआयएमआयएम बीआरएससोबत आघाडी करून लढत आहे.
30 Nov 2023, 17:04 वाजता
मध्य प्रदेशात काय होणार?
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काँग्रेसचा पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे भाजपा सरकार पुनरावृत्ती करू पाहत आहे. मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान झाले होते. ईव्हीएममध्ये उमेदवारांचे भवितव्य कैद झाले आहे.
30 Nov 2023, 17:04 वाजता
राजस्थान परंपरा बदलणार?
काँग्रेसला राजस्थानमध्ये 5 वर्षात पुनरागमन करून सरकार बदलण्याची परंपरा खंडित करायची आहे, तर भाजपला काँग्रेसला सत्तेवरून हटवून सत्ता ताब्यात घ्यायची आहे. मात्र, राजस्थानच्या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला 25 नोव्हेंबरलाच झाला आहे.