Union Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर करताना दिली.
1 Feb 2023, 12:06 वाजता
100 नवीन योजना सुरु होणार
Budget 2023 Updates : रेल्वेसाठी 100 नवीन योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच नवीन योजनांसाठी 75 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने भारतीय रेल्वेला एक मोठी भेट दिली आहे. प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने रेल्वेला 9 पट अधिक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने रेल्वेला 2.40 लाख कोटी रुपये दिले आहेत.
1 Feb 2023, 12:03 वाजता
PM आवास योजना बजेटमध्ये वाढ
Budget 2023 Updates : PM आवास योजना बजेटमध्ये वाढ करण्यात आलेय. केंद्र सरकारच्या या योजनेतील लोकांना घर बांधण्यासाठी सबसिडी दिली जाते. त्यात आता पुन्हा एकदा सरकारने बजेट वाढवण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा अशा लोकांना होईल, ज्यांचे घर अद्याप बांधले गेले नाही किंवा ते घर बांधण्याचा विचार करत आहेत.
1 Feb 2023, 11:52 वाजता
पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता; अर्थमंत्र्यांची घोषणा
Budget 2023 Updates : डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबत डिजीलॉकरचा वापर वाढवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. याशिवाय सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणूनही ओळखले जाईल.
1 Feb 2023, 11:49 वाजता
Budget 2023: 5 G सेवेसाठी अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी 100 लॅब्जची उभारणी करणार
- ई-कोर्ट्सच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 7000 कोटींची घोषणा!
- सरकार नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी आणणार
- यापुढे आता पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र. तसेच युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरु करणार
1 Feb 2023, 11:45 वाजता
Budget 2023 Updates : 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद - अर्थमंत्री
- देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार
- पायाभूत सुविधांमधील भांडवली गुंतवणुकीत 33 टक्क्यांनी वाढ करून ती 10 लाख कोटींपर्यंत नेण्यात आली आहे.
- हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार, मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना
- 10 हजार कोटी शहरी पायाभूत सुविधा करण्यासाठी देणार
- कर्मयोगी योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
- सहकारातून समृद्धी साध्य करण्यासाठी नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 63 हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण केले.
1 Feb 2023, 11:37 वाजता
- मुलांसाठी आर्थिक तरतूद करणार
- 157 नर्सिंग महाविद्यालये सुरु करणार
- लहान मुलांसाठी खास पुस्तके तयार करणार
- मुलासांठी राष्ट्रीय डिजीटल लायब्र
- पूर्वकडील राज्यांच्या विकासासाठी प्रयत्न
- आदिवासी विकासासाठी विशेष भर
1 Feb 2023, 11:36 वाजता
Budget 2023 Updates : अमृतकाळासाठी आमची व्हिजन तंत्रज्ञानवर आधारित ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था, बळकट सार्वजनिक वित्त व्यवस्था, सक्षम वित्त व्यवस्था यावर भर असेल.
1 Feb 2023, 11:36 वाजता
पर्यटनाला चालना देणार
- पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष योजना
- पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राज्य आणि खासगी क्षेत्रांचे सहकार्य घेणार
1 Feb 2023, 11:30 वाजता
Budget 2023 Updates : भारतीय रेल्वेसाठी केंद्र सरकारची 2.40 लाख रुपयांची तरतूद. 2013-14 पेक्षा नऊ पटींनी अधिक तरतूद केल्याची अर्थमंत्री सीतारमण यांची माहिती
1 Feb 2023, 11:28 वाजता
Budget 2023 Updates : अर्थसंकल्प 2023-24 चे प्राधान्यक्रम असेल. सर्वसमावेशक वाढ, शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, अनलॉकिंग क्षमता, हरित वाढ, युवा आणि आर्थिक क्षेत्र : अर्थमंत्री निर्मला सीतारामण
अमृत कालसाठी आमची दृष्टी तंत्रज्ञानावर आधारित आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये सार्वजनिक वित्त आणि मजबूत आर्थिक क्षेत्र आहे. "सबका साथ, सबका प्रयास" च्या माध्यमातून ही "जनभागीदारी" साध्य करणे आवश्यक आहे.