Budget 2023 LIVE Updates : मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Union Budget 2023 Live Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी  बजेट सादर करताना दिली.  

Budget 2023 LIVE Updates : मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Union Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी  बजेट सादर करताना दिली.

 

1 Feb 2023, 11:24 वाजता

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

Budget 2023 Updates : - शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी
- कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवा
- कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना
- मत्स विकासासाठी 6००० कोटी रुपये
- मच्छिमारांसाठी विशेष पॅकेज योजना
 - अन्न साठवण विकेंद्रीकरण केंद्र

1 Feb 2023, 11:23 वाजता

बाजरीचे उत्पादन वाढवणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा

Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात बाजरीचे उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.

1 Feb 2023, 11:18 वाजता

Budget 2023 Updates :  गरीबांना 2024  पर्यत मोफत धान्य देणार. तसेच लाभार्थींच्या खात्यात थेट मदत देण्यात येणार आहे. सर्वांगीन विकासाचं स्वप्न पूर्ण केलं - अर्थमंत्री

1 Feb 2023, 11:16 वाजता

Budget 2023 Updates : हरित विकासासाठी खास प्रयत्न करणार तसेच पर्यावरण पूरक अर्थसंकल्पात विशेष भर

1 Feb 2023, 11:13 वाजता

Budget 2023 Updates :जगात मंदी असूनही, 7% जीडीपी वाढीचा अंदाज आहे: अर्थमंत्री  निर्मला सीतारामण

 

1 Feb 2023, 11:11 वाजता

भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर - निर्मला सीतारमण

Budget 2023 Updates : भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढला आहे. भारत जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीतून पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

1 Feb 2023, 11:10 वाजता

Budget 2023 Updates : भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे - अर्थमंत्री 

1 Feb 2023, 11:10 वाजता

कोरोना काळात कोणी उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली - निर्मला सीतारमण

Budget 2023 Updates : "भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली," असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

1 Feb 2023, 11:10 वाजता

Budget 2023 Updates : भारत एक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था. देशात कोणीही उपाशी पोटी राहणार नाही हे मोदी सरकारचं लक्ष्य - निर्मला सितारामण

1 Feb 2023, 11:09 वाजता

Budget 2023 Updates : भारताची डिजीटल ताकद जगाने ओळखली आहे.