Union Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर करताना दिली.
1 Feb 2023, 11:07 वाजता
Budget 2023 Updates : जगाच्या दृष्टीने आपली अर्थव्यवस्था मजबूत - अर्थमंत्री निर्माल सितारामण
1 Feb 2023, 11:00 वाजता
Budget 2023 Updates : संसदेत अर्थसंकल्पाचे वाचन सुरु. निवडणुकीआधी मतदारांना खूश करण्याची संधी सीतारमण साधणार की आर्थिक शिस्त पाळणार?
1 Feb 2023, 10:52 वाजता
Budget 2023 Updates : अर्थसंकल्प 2023 (Budget 2023) सादर होण्याआधी सरकारी तिजोरीत घसघशीत वाढ. जानेवारीतील जीएसटी कमाई 1 लाख 55 हजार कोटींच्या वर
1 Feb 2023, 10:42 वाजता
Budget 2023 Updates : अर्थसंकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली. थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सादर करतील.
1 Feb 2023, 10:38 वाजता
Budget 2023 Updates : अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणा होण्याची शक्यता.
- टॅक्स स्लॅबमध्ये बदल, करमूक्त उत्पन्न 5 लाखांवर?
- गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
- कृषी क्षेत्रासाठी 2 लाख कोटींची घोषणा?
- पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ?
- मनरेगासाठी मिळणा-या रकमेतही वाढ?
- स्मार्ट फोन स्वस्त होणार?
- सीमेवर चीनसोबत तणाव, संरक्षण बजेटमध्ये 10% वाढ?
- वंदे भारत ट्रेन्ससाठी 1800 कोटी रुपयांची घोषणा?
- बेरोजगारी कमी करण्यासाठी मोठी घोषणा?
1 Feb 2023, 10:36 वाजता
हा भाजपचा नाही तर जनतेचा अर्थसंकल्प - संजय राऊत
Budget 2023 Updates : "अर्थसंसकल्पात केंद्र सरकारनं मुंबईच्या बाबतीत वेगळी भूमिका घ्यायला हवी. पंतप्रधान मुंबईत अलीकडे वारंवार येऊन महाविकास आघाडीच्या कामांची उद्घाटनं करतात. त्यामुळे नुसतं राजकारणासाठी मुंबईत येऊ नका. मुंबईसाठी काहीतरी घेऊन या. केंद्राच्या तिजोरीत मुंबईकडून मोठा वाटा जातो. तसेच मुंबईचे अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. दुसरीकडे देश लुटला जातोय त्यात मुंबईचाही पैसा आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याने मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे हा अर्थसंकल्प भाजपचा नसून जनतेचा आहे," असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
1 Feb 2023, 10:30 वाजता
Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे संसदेत आगमन. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली असून त्यानंतर अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत #UnionBudget2023 सादर करतील.
Delhi | Union Finance Minister Nirmala Sitharaman arrives at the Parliament.
A Union Cabinet meeting will be held here at 10 am following which the Finance Minister will present the #UnionBudget2023 in the Parliament at 11 am. pic.twitter.com/4RN67imH50
— ANI (@ANI) February 1, 2023
1 Feb 2023, 09:56 वाजता
अर्थसंकल्पाचे पडसाद शेअर बाजारावर
Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थसंकल्पाचे पडसाद शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहेत. शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये 378 आणि निफ्टीच्या निर्देशांकात 111 पॉईंट्सची वाढ झाली आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस विशेष आहे. कारण महिला राष्ट्रपतीच्या सहीचा अर्थसंकल्प महिला अर्थमंत्री सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्प, सकाळी 11 वाजता सीतारमण यांचं भाषण होणार आहे.
Sensex opens in green, currently up by 437.32 points and trading at 59,987.22. pic.twitter.com/e9yowlYz6U
— ANI (@ANI) February 1, 2023
1 Feb 2023, 09:49 वाजता
Budget 2023 Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अर्थमंत्री निर्मला सीतारामण, राज्यमंत्री डॉ भागवत किशनराव कराड, राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2023-24चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
Union Minister of Finance and Corporate Affairs Nirmala Sitharaman, MoS Dr Bhagwat Kishanrao Karad, MoS Pankaj Chaudhary and senior officials of the Ministry of Finance called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan before presenting the Union Budget 2023-24. pic.twitter.com/S9GJiDG1aw
— ANI (@ANI) February 1, 2023
1 Feb 2023, 09:47 वाजता
डाळी आणि कडधान्यांचे भाव शंभरीपार
Budget 2023 Updates :सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी. सर्वच डाळी आणि कडधान्यांचे भाव शंभरीपार गेलेत. होळीपर्यंत हे भाव चढेच राहतील असा अंदाज घाऊक व्यापा-यांनी व्यक्त केलाय... होळीनंतर बाजारात नवीन उत्पादन यायला सुरुवात झाल्यास हे दर कमी होतील अशी आशा आहे.. सध्या बाजारात डाळी आणि कडधान्यांची टंचाई आहे. आयात होणाऱ्या डाळींचं प्रमाणही घटले आहे. त्यामुळे डाळी आणि कडधान्ये महागलेत.