Budget 2023 LIVE Updates : मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Union Budget 2023 Live Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी  बजेट सादर करताना दिली.  

Budget 2023 LIVE Updates : मोठी घोषणा, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

Union Budget 2023 Updates : मोदी 2.0 सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर करताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तसेच इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मोबाईल फोन  आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. मात्र, कस्टम ड्युटी वाढविल्याने सोने आणि चांदी महाग झाली आहे. तसेच महिलांसाठी बचत गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. महिलांसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रासाठी विशेष डिजीटल सेवेबरोबरच कृषी क्षेत्रासाठी विकास क्लस्टर योजना असणार आहे. पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. तसेच 2.40 लाख कोटी रुपयांची रेल्वेसाठी तरतूद करण्यात आली असून देशात 50 नवीन विमानतळांची उभारणी करणार आहे, अशी माहिती र्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी  बजेट सादर करताना दिली.

 

1 Feb 2023, 09:22 वाजता

बजेट पूर्वीच विमान प्रवाशांना मोठा झटका 

Budget 2023 Updates : बजेट पूर्वीच विमान प्रवाशांना मोठा झटका बसलाय.. IOCकडून विमानाच्या इंधनाच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्यात आलीये. इंडियन ऑयल कॉरपोरेशननं आज सकाळीच नवे दर जाहीर केले असून आजपासूनच नवे दर लागू करण्यात आलेत.. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.. 

1 Feb 2023, 09:21 वाजता

Budget 2023 Live Updates : आगामी लोकसभा निवडणुकांआधीचं मोदी सरकारचं हे अखेरचं बजेट असेल. तेव्हा या बजेटवर लोकसभा निवडणुकीची छाप असेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

- सकाळी 9.25 वाजता - केंद्रीय अर्थमंत्री राष्ट्रपतींची मंजुरी घेणार

- सकाळी 10 वाजता - केंद्रीय अर्थमंत्री संसदेत दाखल होतील

- सकाळी 10.10 वाजता - केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेणार

- सकाळी 11 वाजता - संसदेत बजेट सादर करणार

- दुपारी 3 वाजता - केंद्रीय अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद

1 Feb 2023, 09:12 वाजता

Budget 2023 Updates  : आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच2023-2024 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. त्याचवेळी वाढती महागाईचीही चिंता आहे. त्यामुळे महागाई रोखण्यासाठी बजेटमध्ये काय आहे, याची उत्सुकता आहे.

1 Feb 2023, 09:09 वाजता

Budget 2023 Updates : अर्थमंत्री सीतारामण आज केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करणार आहेत; 2.0 मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे.

1 Feb 2023, 09:06 वाजता

 Budget 2023 Updates : राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. अर्थमंत्री नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील आणि त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करतील.

1 Feb 2023, 09:01 वाजता

हा भाजपचा नाही तर जनतेचा अर्थसंकल्प - संजय राऊत

Budget 2023 Updates : केंद्र सरकारनं मुंबईच्या बाबतीत वेगळी भूमिका घ्यायला हवी. पंतप्रधान मुंबईत अलीकडे वारंवार येत आहेत. महाविकास आघाडीच्या कामांची उद्घाटनं पंतप्रधान मोदी करत आहेत. त्यामुळे नुसतं राजकारणासाठी मुंबईत येऊ नका. मुंबईसाठी काहीतरी घेऊन या. केंद्राच्या तिजोरीत मोठा वाटा मुंबईकडून जातो. पण मुंबईचे अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. अशातच देश लुटला जातोय त्यात मुंबईचाही पैसा आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या गेल्याने मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय. तसेच हे बजेट भाजपचे नसून जनतेचे आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय

1 Feb 2023, 08:13 वाजता

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प ( Budget 2023) सादर करतील. या अर्थसंकल्पात महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे सरकारसमोरचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कोरोना संकटावर मात करुन मांडण्यात येणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांपासून ते नोकरदार वर्गांकडून अनेक अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या 10 मोठ्या अपेक्षा काय आहे, ते जाणून घ्या.

1 Feb 2023, 07:27 वाजता

आयकर स्लॅबमध्ये काही बदल होण्याची शक्यता

Budget 2023 Updates : अर्थसंकल्पात 2023-24 मध्ये पगारदारांसाठी आयकर स्लॅबमध्ये (Income Tax) काही बदल होण्याची शक्यता आहे आणि ग्रामीण नोकऱ्यांसारख्या योजनांद्वारे गरीबांना काही प्रोत्साहन मिळू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या अंतिम पूर्ण वर्षाच्या खर्चाच्या योजनेत स्थानिक उत्पादनासाठी सवलती वाढवण्याचा प्रयत्न करतील.  

1 Feb 2023, 07:15 वाजता

लोकसभेत आज अर्थसंकल्प, सकाळी 11 वाजता सीतारमण यांचं भाषण 

Union Budget 2023 Updates : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांचा चौथा अर्थसंकल्प लोकसभेत मांडणार आहे. गेलं वर्षभर सातत्यानं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातून त्यांच्या खिशावर पडलेला भार काहीसा हलका होईल अशी अपेक्षा आहे. पण सीतारमण यांच्यापुढे कोव्हिड काळात बिघडलेली अर्थव्यवस्थेची शिस्त पुन्हा रुळावर आणण्याचं आव्हान आवासून उभं आहे. जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान भारताच्या शिरपेचात आलेला असला, तरी हा क्रमांक वर जायचा असेल तर आर्थिक शिस्त पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही शिस्त पाळायची असेल, तर जनेतला आवडणाऱ्या आणखी तिजोरीवर भार टाकणाऱ्या घोषणा करणे अर्थमंत्र्यांना परवडणारे नाही. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीला जेमतेम सव्वा वर्ष उरलेलं असताना सादर होणाऱ्या आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण मतदारांना खूश करतात की आर्थिक शिस्तीचा मार्ग चोखाळतात याकडे साऱ्या देशाचे डोळे लागले आहे. सकाळी 11 वाजता सीतारमण यांचं भाषण सुरु होईल. आणि या भाषणाचं भाषणाआधी आणि भाषणानंतरच  विश्लेषण आज सकाळी 10 वाजल्यापासून फक्त 'झी 24 तास'वर बघू शकणार आहात.