'भ्रष्टाचारी नंबर 1' अशीच 'मिस्टर क्लीन'ची ओळख- पंतप्रधान मोदी

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याचा प्रचार संपताना पातळी सोडून टीका होताना दिसत आहे. 

Updated: May 5, 2019, 08:27 AM IST
'भ्रष्टाचारी नंबर 1' अशीच 'मिस्टर क्लीन'ची ओळख- पंतप्रधान मोदी  title=

उत्तर प्रदेश : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याचा प्रचार संपताना पातळी सोडून टीका होताना दिसत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या रॅलीत गंभीर टीका केली. राहुल गांधी यांना उद्देशून मोदींनी वाक्य उच्चारलं. तुमच्या वडिलांना त्यांचे साथीदार मिस्टर क्लिन म्हणत असले तरी त्यांची ओळख भ्रष्टाचारी नंबर १ अशीच होती अशा शब्दात मोदींनी टीकास्त्र सोडलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी बोफोर्स कथीत गैरव्यवहाराचा उल्लेख करताना हे वक्तव्य केलं. काँग्रेस आणि युपीएला केंद्रात कमकुवत सरकार आणण्यात रस आहे अशी टीका त्यांनी केली.

तीन टप्पे महत्त्वाचे 

लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 14 लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे. या ठिकाणच्या निवडणुकीचा प्रचार संपला असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची नावे आहेत. पाचव्या टप्प्यातील प्रचार शनिवारी पाच वाजता संपला. यामध्ये 7 राज्यांतील 51 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये मध्य प्रदेशच्या 7, राजस्थान 12, बंगाल 7, बिहारच्या 5, जम्मू काश्मीर 2, झारखंडच्या 4 जागांवर मतदान होणार आहे. 

अखेरचे ३ टप्पे भाजपासाठी महत्त्वाचे आहेत. विशेषतः सोमवारी मतदान होणाऱ्या पाचव्या टप्प्यात ५१ पैकी ३८ मतदारसंघ भाजपाकडे आहेत. अखेरच्या तीन टप्प्यात १६९ मतदारसंघात मतदान होणार आहे. यात सर्वाधिक खासदार हे भाजपाचे आहेत. उत्तर भारतातले हे टप्पे जिंकण्यासाठी भाजपाला शिकस्त करावी लागणार आहे. उरलेल्या तीन टप्प्यातल्या १६९ पैकी तब्बल ११६ खासदार भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपासाठी हे अखेरचे तीन टप्पे निर्णायक आहेत. उद्या मतदान होत असलेल्या ५१ मतदारसंघात ३८ ठिकाणी भाजपाचे खासदार आहेत.