मोदी पुन्हा सत्तेत, गुंतवणुकदारांना १५ मिनिटांत ३ लाख करोडोंचा फायदा

एकूण मार्केट कॅपिटल वाढून १ करोड ५३ लाख करोड रुपयांवर दाखल झालंय

Updated: May 23, 2019, 01:53 PM IST
मोदी पुन्हा सत्तेत, गुंतवणुकदारांना १५ मिनिटांत ३ लाख करोडोंचा फायदा title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालात आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, देशात पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. जनतेनं पुन्हा एकदा देशाची धुरा नरेंद्र मोदींच्या खांद्यावर सोपवलीय. आत्तापर्यंत निकालाच्या आकड्यांनुसार, एनडीएनं बहुमताचा आकडा पार करत ३४२ जागांवर आघाडी घेतलीय. यामुळेच गुंतवणुकदारांचा विश्वास वाढलाय. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येतोय. गुंतवणुकदारांनी आज बंपर कमाई केलेली दिसून येतेय. शेअर मार्केटनं घेतलेल्या उसळीमुळे गुंतवणुकदारांनी १० ते १५ मिनिटांत २.८७ लाख करोड रुपयांची कमाई केली.

सेन्सेक्सचा हाय रेकॉर्ड

सेन्सेक्सनं आत्तापर्यंत हाय रेकॉर्डनं गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकूण २.८७ लाख करोड रुपयांची वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदी सूचकांक दुपारच्या वेली ९०० अंकांनी वाढून ४०,०१२.३५ अंकांवर दाखल झाला. एका क्षणाला सेन्सेक्सनं ४०१२४.९६ अंकांचाही रेकॉर्ड गाठला. यासोबतच शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांनी बाजारात २.८७ लाख करोड रुपयांची वाढ नोंदवली.

मार्केट कॅपिटल १.५३ लाख करोडोंवर

एकूण मार्केट कॅपिटल वाढून १ करोड ५३ लाख करोड रुपयांवर दाखल झालंय. बुधवारी मार्केट बंद होताना मार्केट कॅप १ करोड ५० लाख करोड रुपयांवर होतं. सेन्सेक्समध्ये सामील शेअर्समध्ये एस बँक, इंडसइंड बँक, लार्सन एन्ड टुब्रो, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेटच्या शेअर्सना चांगला प्रतिसाद मिळाला.