नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेसची राज्यातल्या तिसरी उमेदवारी यादी जाहीर झालीय. या यादीत अनेक अनपेक्षित नावांचा समावेश करण्यात आला आहे. नंदूरबार के. सी. पडवी, मुंबई दक्षिण - मध्यमधून एकनाथ गायकवाड, शिर्डी भाऊसाहेब कांबळे, रत्नागिरी - सिंधुदुर्गमधून नविनचंद्र बांदीवडेकर यांना संधी देण्यात आली आहे. त्याआधी दुपारी नांदेडमधून अशोक चव्हाणांनाच काँग्रेसनं मैदानात उतरवलंय. तर चंद्रपूरमधून विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी दिली.
धुळ्यातून रोहिदास पाटील यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि विद्यमान आमदार कुणाल पाटील यांना मैदानात उतरवलंय. तर यवतमाळ-वाशिममधून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना उमेदवारी देण्यात आलीय. वर्ध्यातून चारूलता टोकस तर अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांना तर रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आलीय.
Congress party releases list of 9 candidates in Kerala and Maharashtra (2 - Kerala and 7- Maharashtra) for the upcoming #LokSabhaElections2019 pic.twitter.com/YrnwfPfYr9
— ANI (@ANI) March 19, 2019
यापूर्वी, १३ मार्च रोजी राज्यात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांना महाराष्ट्रात नागपूरमधून, गडचिरोलीतून डॉ. नामदेव उसेंदी, दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा तर सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, उत्तर-मध्य मुंबईतून माजी खासदार प्रिया दत्त यांची नावं पक्षानं अधिकृतरित्या जाहीर केली होती.