मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 7000 लोकांची उपस्थिती, या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण... समोर आलं Invitation Card

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला 7000 लोकं उपस्थित राहाणार आहेत. याशिवाय बांगलादेस, श्रीलंका, मालदीप, भूतान यासह अनेक देशाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे

राजीव कासले | Updated: Jun 8, 2024, 03:22 PM IST
मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 7000 लोकांची उपस्थिती, या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण... समोर आलं Invitation Card title=

Narendra Modi Oath Ceremony : एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) 9 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) शपथविधी सोहळा पार पडणारेय. या सोहळ्याला विदेशी पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलंय.  बांगलादेश, भूतान, श्रीलंकेचे पंतप्रधान तर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर अनेक राजकीय नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकूण 7000 हजार लोकं सोहळ्याला उपस्थित राहाणार असल्याचं सांगितलं जातंय. रविवारी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या (Oath Ceremony) निमंत्रण पत्रिकेची पहिला फोटो समोर आला आहे. शुक्रवारी एनडीएच्या (NDA) संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मोदी यांनी राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मु यांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपतींना रविवारी त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. शपथग्रहण सोहळ्याला अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहाणार आहेत. यासाठी दिल्लीत सुरक्षेचा कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत नो फ्लाईग झोन घोषित करण्यात आला आहे. राष्ट्रवदी भवनची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. 

या देशांच्या नेते उपस्थित राहाणार
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि इतर अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहाणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष वावेल रामखेलावान यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

दिल्लीत नो फ्लाईंग झोन घोषित
शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला छावणीचं रुप आलं आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत नो फ्लाईग झोन घोषित करण्यात आला आहे. ड्रोन उडवण्यावर किंवा पॅराग्लाइडिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 9 आणि 10 जूनला दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. राष्ट्रपदी भवनला निमलष्करी दलाच्या 5 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. तसंच एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर तैनात केलं जाणार आहेत. 

एनडीएला बहुमत
लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवता आलं नाही. पण एनडीएने 293 जागा मिळवल्या. भाजपाच्या खात्यात 240 जागा आल्या. तर इंडिया आघाडीला 234 जााग मिळाल्या आहेत. यात काँग्रेसला 99 जागा जिंकता आल्या.