Gold Silver Price: सणासुदीच्या दिवशी, चांगले निमित्त साधून आपल्याकडे सोने खरेदी केली जाते. सोन्याचे दर कधी कमी होतात? याकडे साऱ्यांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमती जास्त असल्याने आपण थोडे थोडे सोने खरेदी करुन ठेवतो. अशा गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याचे दर कोसळले आहेत. याची कारणेही समोर आली आहेत. याबद्दल जाणून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला सोने-चांदी परवडणारी नव्हती. आता सोन्या-चांदीत पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते.
चीनने आता सोन्याच्या खरेदीवर निर्बंध आणले आहेत. चीनकडून सोने खरेदीला पूर्णविराम मिळाल्याचे पडसाद मार्केटमध्ये दिसू लागलेय त्यामुळे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 2 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. सोन्याचे दर कमी होण्याच्या कारणांपैकी हे एक कारण मानले जाते.
MCX एक्सचेंजवर शुक्रवारी संध्याकाळी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. MCX एक्सचेंजवर, 5 ऑगस्ट 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 2 टक्क्यांहून अधिक घसरले होते. यानंतर सोन्याचे दर 71 हजार 341 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालेले पाहायला मिळाले. 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने घसरले आणि 72 हजार 40 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. त्यामुळे सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य असू शकते.
MCX एक्सचेंजवर, शुक्रवार, 5 जुलै 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 201 रुपयांनी घसरला. यानंतर चांदीचा भाव 88,ृ हजार 888 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर 5 सप्टेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी 91 हजार 50 रुपयांच्या पातळीवर बंद झाली आहे. 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा दर घसरलेला पाहायला मिळाला. हा दर 93 हजार 274 रुपयांवर बंद झाली.
कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत 2.76 टक्क्यांनी किंवा $65.90 ने $2,325 प्रति औंस झाली आहे. त्याच वेळी, सोन्याची जागतिक स्पॉट किंमत प्रति औंस $ 2,293.78 पर्यंत घसरली आहे. त्यामुळे चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी हे चांगले संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
चांदीच्या जागतिक किमतीतही घसरण झाली आहे. कॉमेक्सवर चांदीची फ्युचर्स किंमत 1.93 टक्क्यांनी किंवा $6.14 ने घसरून $29.44 प्रति औंस झाली. दुसरीकडे चांदीची जागतिक स्पॉट किंमत $ 29.15 प्रति औंसवर पोहोचली आहे.