मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा, 5 ते 1000 रुपयांपर्यंत देणगी द्या'

भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केलेय. 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा दिलाय.  

Updated: Dec 26, 2018, 10:49 PM IST
मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा, 5 ते 1000 रुपयांपर्यंत देणगी द्या'  title=

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केलेय. 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा दिलाय. हा नारा देण्याआधी भाजपने जाहिरातीच्या माध्यमातून आपली छोटी मदत मोदी सरकारला करा, असे आवाहन केलेय. याबाबत पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विट केलेय. यात  '5 ते 1000 रुपयांपर्यंत देणगी द्या', असे नमुद केलेय.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी यांना जाहीर केले. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. यात भाजपने मोठे यश संपादन केले. 'अब की बार मोदी सरकार' चा नारा देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मोदी सरकारचा नारा देण्यात आलाय. हा नारा देताना भाजपला मदत करण्याचे आवाहन करण्यात आलेय. ते सुद्धा जाहिरातीच्या माध्यमातून.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत 'फिर एक बार, मोदी सरकार' हे घोषवाक्य असल्याचे जाहिरातीच्या माध्यमातून दिसून येत आहे. अमित शाह यांनी ट्विटरवर हॅशटॅगच्या स्वरुपात हे घोषवाक्य पोस्ट केलेय. त्यासोबत एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मदत करा. त्यासाठी नमो अॅपच्या माध्यमातून पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत देणगी द्यावी, असे आवाहन करण्यात आलेय.