गिरिराज सिंह यांच्याविरुद्ध लढणाऱ्या कन्हैयाकडे 28 तासांत 28 लाख गोळा

एकीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह आहेत तर दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआयचा उमेदवार कन्हैया कुमार यांच्यात लढत 

Updated: Mar 28, 2019, 02:05 PM IST
गिरिराज सिंह यांच्याविरुद्ध लढणाऱ्या कन्हैयाकडे 28 तासांत 28 लाख गोळा title=

नवी दिल्ली : बिहार बेगूसराय लोकसभा जागेवर एक चांगली स्पर्धा बघायला मिळणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा या एका जागेवर लागल्या आहेत. कारण यामध्ये एकीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह आहेत तर दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआयचा उमेदवार कन्हैया कुमार यांच्यात लढत आहे. आरजेडीने बेगूसराय येथून तन्वीर हसन याला उमेदवार घोषित केले आहे. ही लढाई जिंकण्यासाठी कन्हैयाला वोट सोबत नोटांचीही गरज लागणार आहे. यासाठी त्याने जनतेला आवाहन देखील केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत त्याने अवघ्या 28 तासांत 28 लाख गोळा केले आहेत. 

Image result for kanhaiya kumar vs giriraj zee

कन्हैयाने लोकसभा निवडणूकीसाठी ऑनलाईन माध्यमातून 70 लाखाची रक्कम गोळा करताना एक समांतर अभियान सुरू केले आहे. रविवारी सीपीआयच्या नेत्यांनी त्याच्या उमेदवारीची घोषणा केली. तसेच ही टक्कर पंतप्रधान मोदींचे उमेदवार गिरिराज सिंह यांच्यासोबत असल्याने साधन-संसाधनात आपण त्यांच्याशी स्पर्धा करु शकत नसल्याचे सीपीआयने यावेळी म्हटले. यासाठी लोकांकडून आर्थिक सहाय्या सोबत मत मागण्याचे अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान बेगूसराय मतदार संघ क्षेत्रातच असेल असे वाटले होते पण कन्हैयाने एक व्हिडीओ जारी करत हे ऑनलाईन फंड गोळा करण्याचे अभियान सुरू केले. याआधीही सीपीआयच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीत 'नोट सोबत वोट' हे अभियान राबवले आहे. प्रसिद्ध समाजवादी नेते मधु लिमये, जॉर्ज फर्नांडीस यांना लोकांनी वोट देखील दिले आणि नोट देखील दिल्या. 

Image result for kanhaiya kumar vs giriraj zee

2014 च्या लोकसभा निवडणुकीत बेगूसराय जागेवरून भाजपाला 39.72 टक्के वोट मिळाले. तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या राजदला 34.31 टक्के वोट मिळाले होते. कन्हैया कुमारच्या सीपीआय पार्टीच्या उमेदवाराला 17.87 टक्के वोट मिळाले होते. बेगूसराय येथे पाऊणे पाच लाख भूमिहार मतदार असून ते परंपरागत भाजपाचे मतदार मानले जातात. तर 2.5 लाख मुस्लिम मतदार देखील इथे आहेत. गिरिराज सिंह आणि कन्हैया कुमार हे दोघेही भूमिहार आहेत. दुसरीकडे आरजेडीने मुस्लिम उमेदवार तन्वीर हसन यांना तिकिट दिले आहे. इथे यादव मतदारांची संख्याही मोठी आहे.

गिरिराजांची समजूत 

भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांची समजूत काढण्यात भाजपाला यश आले आहे. ते आता बेगूसराय लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहीती दिली. गिरिराज सिंह यांचे सर्व म्हणणे ऐकले आहे. पार्टी त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढेल. त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 2014 ची लोकसभा निवडणूक गिरिराज सिंह नावादा मतदार संघातून लढले होते. त्यांना तिथे विजयही मिळाला होता. यावेली नवादा येथील जागा राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) च्या सहयोगी लोक जनशक्ती पार्टी( लोजपा) च्या खात्यात गेली आहे