'ए सॅट' ऐकल्यावर ज्यांना थिएटरचा सेट आठवला त्यांच्या बुद्धीमत्तेवर शंका- पंतप्रधान

यावर्षी आम्हाला 2014 पेक्षा मोठा विजय मिळेल असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

Updated: Mar 28, 2019, 01:23 PM IST
'ए सॅट' ऐकल्यावर ज्यांना थिएटरचा सेट आठवला त्यांच्या बुद्धीमत्तेवर शंका- पंतप्रधान  title=

नवी दिल्ली :ए सॅट हा शब्द ऐकल्यावर थिएटरचा सेट ज्यांना आठवला त्यांच्या बुद्धीमत्तेबाबतच शंका येते असा घणाघाती हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी मेरठमधून केला. लोकसभा निवडणूक 2019 च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराला आजपासून सुरूवात झाली आहे. त्यांनी आज मेरठ येथे प्रचारसभेचा नारळ फोडला. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ देखील उपस्थित होते. ज्यांना 2019 ला कोण जिंकणार हे पाहायचे असेल त्यांनी हा जनसागर पाहा असे मोदी यांनी यावेळी म्हटले. जमीन, आकाश किंवा अंतराळ वा सर्जिकल स्ट्राईकचे साहस तुमच्या या चौकीदाराच्या सरकारने करून दाखवले. यावर्षी आम्हाला 2014 पेक्षा मोठा विजय मिळेल असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

तसेच ए सॅट सॅटलाईटच्या यशस्वी परिक्षणावरून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

ए सॅट शब्द ऐकल्यावर थिएटरमधला सेट आठवलेल्यांच्या बुद्धीमत्तेबाबतच शंका येते घणाघाती हल्लाबोल त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.  जे आधी गोरगरीबांचं बँक खातं उघडू शकले नाहीत, ते त्यात पैसे काय टाकणार असा सवाल मोदींनी विचारला. जमीन, आकाश, अंतराळात सर्जिकल स्ट्राईक करण्याचं धाडस चौकीदाराने दाखवलं असा दावाही त्यांनी केला.