‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!

PM Narendra Modi Interview:  भाजपचा जाहिरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Apr 15, 2024, 07:13 PM IST
‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते! title=
PM Narendra Modi Interview

PM Narendra Modi Interview: मी 2047 ला डोळ्यासमोर ठेवून काम केले. यासाठी मी सर्वांकडून सल्ला मागितला. विद्यापीठ संघटना, विद्यार्थी सर्वांचे सल्ले घेतले. एआयची मदत घेतली. अधिकाऱ्यांसोबत बसलो. पुढच्या 25 वर्षात भारत कसा हवाय? यावर 2-3 तास चर्चा करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत ही माहिती दिली. मागच्या 2 वर्षांपासून मी 2047 व्हिजन घेऊन मी काम करतोय. यात मला अजून खूप काम करायचं. मी डॉक्यूमेंट बनवतोय. ते माझं व्हिजन आहे. हे 15-20 लाख लोकांचं मत आहे. राज्यांनी यावर काम करावं. हे काम भाजपचं नाही तर संपूर्ण देशाचं आहे. यानंतर मी नीती आयोगाची बैठक बोलवेन, असे ते म्हणाले. जनतेचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. 

भाजपचा जाहीरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार आहे. मी पूर्ण प्लानिंग करुन हे प्रत्यक्षात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी ज्या राज्यात जातो तिथला ड्रेस परिधान करतो. यावर काहीजण टीका करतात. राजकारणात इतका द्वेश बरा नव्हे असे त्यांनी सांगितले. राम मंदिर सरकारच्या नव्हे तर जनतेच्या पैशातून बनले आहे. पंतप्रधान म्हणून नाही तर मी रामभक्त म्हणून अयोध्येला गेलो होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.कोणाला डॉक्टर बनायचे असेल तर मातृभाषेत बना. सही करायची असेल तर मातृभाषेत सही करा असे मी सांगत असल्याचे ते म्हणाले.

इलेक्ट्रोल बॉण्ड चुकीचा निर्णय होता का?

देशातील निवडणुकीला काळ्या पैशापासून वाचवायचे हे आमच्यासमोर आव्हान होते. पैसे लोकांकडून घ्यावे लागतात. सर्व पार्टी घेतात. काळ्या पैशापासून देशाला कसं वाचवायचं हा प्रामाणिक विचार माझा होता. लोकसभेत वादविवाद झाला. हजार आणि 2 हजारच्या नोट आम्ही बंद केल्या. निवडणुकीत मोठ मोठ्या नोट्या वापरल्या जातात. इलेक्टोरल बॉण्डमुळे तुम्हाला कोणी पैसा दिला, कोणाला दिला याची माहिती मिळते. प्रत्येक गोष्टीत सुधाराची संधी असते. यातही आहे. प्रामाणिकपणे विचार करुया. 3 हजारमधील 26 कंपन्यांवर कारवाई झाली. 16 कंपन्यातील 37 टक्के पैसे भाजपाला मिळाले असा आरोप केला गेला. पण 63 टक्के भाजपच्या विरोधी पक्षाला मिळाले. 

ईडी-सीबीआयचा गैरवापर?

ईडी सीबीआय याचा वापर भाजप करतेय असा आरोप विरोधक करतेय. यावर मोदींनी भाष्य केले. आम्ही निवडणूक आयोगात चांगले बदल केले. निवडणूक आयोग कमिशनर असे होते जे नंतर कॉंग्रेसचे नेते बनले. नाचता येईना अंगण वाकडे असं विरोधकांचं झालंय. त्यामुळे ते ईडी सीबीआयचं नाव घेतात. ईमानदाराला भीती नसते. ईडीने जेवढ्या केसेस केल्या त्यातील 3 टक्केच राजकीय व्यक्ती आहेत. 97 टक्के लोकांचा राजकीय नेत्यांशी काही संबंध नव्हता. काही ड्रग्ज माफीया आहेत. 2014 च्या आधी त्यांनी केवळ 5 हजार कोटींची संपत्ती अटॅच केली. पण माझ्या काळात ईडी 1 लाख करोडची संपत्ती अटॅच केली. आमच्या काळात ईडीने 22 हजार कोटी रुपयांची कॅश हस्तगत केली. आम्हाला भ्रष्टाचाराशी लढाई लढायला हवी, असे ते म्हणाले.