युक्रेन-रशिया युद्ध कसं थांबवलं? मोदींनी सांगितला भारतीयांना वाचवण्याचा ‘तो’ किस्सा!

Narendra Modi On Ukrain War:  युक्रेन-रशिया युद्धातून भारतातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणलं गेलं. यावेळी युद्ध थांबवण्यात तुम्ही वैयक्तिक बोलणी केली असे म्हटले जाते. हे खरे आहे का? असा प्रश्न पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यात आला. 

Pravin Dabholkar | Updated: Apr 15, 2024, 07:01 PM IST
युक्रेन-रशिया युद्ध कसं थांबवलं? मोदींनी सांगितला भारतीयांना वाचवण्याचा ‘तो’ किस्सा! title=
PM Narendra Modi On Ukrain War

Narendra Modi On Ukrain War: युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं, अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी या घटनेचा खुलासा केला आहे.  युक्रेन-रशिया युद्धातून भारतातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणलं गेलं. यावेळी युद्ध थांबवण्यात तुम्ही वैयक्तिक बोलणी केली असे म्हटले जाते. हे खरे आहे का? असा प्रश्न पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यात आला. 

काय म्हणाले पंतप्रधान?

युक्रेन तर फार दूरची गोष्ट आहे. त्याचे खूप कौतुक झाले. पण आम्ही 2014 पासून अशा घटनांमधून देशवासियांना बाहेर काढले आहे. सुषमा स्वराज यांनी त्यांच्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.  आम्ही यमनमधून लोकांना आणंल. त्यावेळी मी साऊदीशी बोललो. हे एक वेळ असते जेव्हा युद्ध होत नाही. तेव्हा आम्ही यमनमधून आम्ही 5 हजार लोकांना आणंल होतं. 

युक्रेन आणि रशियाशी माझे चांगले संबंध आहेत. ही युद्धाची वेळ नाहीय, हे मी दोघांना सार्वजनिक सांगू शकतो. माझी क्रेडीबिलिटी आहे. भारतातील इतके लोक, तरुण फसले आहेत. मला तुमची मदत पाहिजे. मी इतकी व्यवस्था केली. तुम्ही काय करु शकता.  भारताचे इतके लोक युद्धात अडकले आहेत. माझी मदत करा असं मी त्यांना सांगितले. त्यांनी मदत केली. त्यावेळी अनेक भारतीय हातात तिरंगा घेऊन उभे होते. सोबत विदेशी देखील भारताचा झेंडा हातात घेऊन उभे होते. ही माझ्या भारताची गॅरंटी होती असे त्यांनी सांगितले. 

इलेक्ट्रोल बॉण्ड चुकीचा निर्णय होता का?

देशातील निवडणुकीला काळ्या पैशापासून वाचवायचे हे आमच्यासमोर आव्हान होते. पैसे लोकांकडून घ्यावे लागतात. सर्व पार्टी घेतात. काळ्या पैशापासून देशाला कसं वाचवायचं हा प्रामाणिक विचार माझा होता. लोकसभेत वादविवाद झाला. हजार आणि 2 हजारच्या नोट आम्ही बंद केल्या. निवडणुकीत मोठ मोठ्या नोट्या वापरल्या जातात. 

इलेक्टोरल बॉण्डमुळे तुम्हाला कोणी पैसा दिला, कोणाला दिला याची माहिती मिळते. प्रत्येक गोष्टीत सुधाराची संधी असते. यातही आहे. प्रामाणिकपणे विचार करुया. 

3 हजारमधील 26 कंपन्यांवर कारवाई झाली. 16 कंपन्यातील 37 टक्के पैसे भाजपाला मिळाले असा आरोप केला गेला. पण 63 टक्के भाजपच्या विरोधी पक्षाला मिळाले. 

‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!

ईडी-सीबीआयचा गैरवापर?

ईडी सीबीआय याचा वापर भाजप करतेय असा आरोप विरोधक करतेय. यावर मोदींनी भाष्य केले. आम्ही निवडणूक आयोगात चांगले बदल केले. निवडणूक आयोग कमिशनर असे होते जे नंतर कॉंग्रेसचे नेते बनले. 

नाचता येईना अंगण वाकडे असं विरोधकांचं झालंय. त्यामुळे ते ईडी सीबीआयचं नाव घेतात. ईमानदाराला भीती नसते. 

ईडीने जेवढ्या केसेस केल्या त्यातील 3 टक्केच राजकीय व्यक्ती आहेत. 97 टक्के लोकांचा राजकीय नेत्यांशी काही संबंध नव्हता. काही ड्रग्ज माफीया आहेत. 2014 च्या आधी त्यांनी केवळ 5 हजार कोटींची संपत्ती अटॅच केली. पण माझ्या काळात ईडी 1 लाख करोडची संपत्ती अटॅच केली. 

आमच्या काळात ईडीने 22 हजार कोटी रुपयांची कॅश हस्तगत केली. आम्हाला भ्रष्टाचाराशी लढाई लढायला हवी, असे ते म्हणाले.