Loksabha Elections 2019 : केरळात डाव्यांनी उचलला राहुल गांधींना पराभूत करण्याचा विडा

राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करताच... 

Updated: Apr 1, 2019, 08:04 AM IST
Loksabha Elections 2019 : केरळात डाव्यांनी उचलला राहुल गांधींना पराभूत करण्याचा विडा  title=

तिरुवअनंतपूरम : LokSabha Elections 2019 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी Rahul Gandhi हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड Wayanad येथूनही निवडणूक लढणार असल्याचं रविवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं. पण, त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय पटलावर अनेकांनीच त्यांच्यावर निशाणा  साधण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांनी Kerala केरळच्या वायनाड मतदार संघातून निवडणूक लढण्याचा जो निर्णय घेतला आहे, ते पाहता त्यांची लढत ही भाजपसोबत नसून डाव्या पक्षांशी असणार आहे, असा इशारा केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन P Vijayan  यांनी दिला. 

'केरळमधील एकूण वीस मतदार संघांपैकी एका मतदार संघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत. त्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही', असं म्हणत आम्ही त्यांना टक्कर देऊ असा विडाच पिनरई विजयन आणि डाव्या पक्षांनी उचलला आहे. गांधी यांनी ज्या मतदार संघात भाजप BJP भक्कम आहे तेथून निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. त्यांची ही लढत तर फक्त डाव्यांविरोधातच आहे, असं विजयन म्हणाल्याचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं. 

विजयन यांच्या वक्तव्याचं समर्थन करत सीपीएमचे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली. 'डाव्यांविरोधात राहुल गांधींसारखा उमेदवार उभा करणं म्हणजे केरळात डाव्याना लक्ष्य केल्यासारखंच आहे. याचा तीव्र विरोध केला जाणारच. त्यामुळे आम्ही या निवडणुकांमध्ये वायनाड मतदार संघात राहुल गांधीचा पराभव करुच' असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वायनाड मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा निर्णय पाहता यातून त्यांची डाव्यांशी असणारी लढतच प्रतीत होत आहे. 

नवी दिल्ली येथे काँग्रेस नेते ए.के. एँटनी यंनी राहुल गांधी हे वायनाड मतदार संघातून लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहणार असल्याचं जाहीर करताच केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. उत्तर केरळमध्ये असणाऱ्या वायनाड येथे २३ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता डावे राहुल गांधींना पराभूत करणार, की मतदार त्यांचं भवितव्य ठरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.