दिल्लीतील 11 जणांचं मृत्यूचं प्रकरण: आता प्रेम प्रकरण आलं समोर

आणखी एक धक्कादायक खुलासा

Updated: Jul 9, 2018, 11:53 AM IST
दिल्लीतील 11 जणांचं मृत्यूचं प्रकरण: आता प्रेम प्रकरण आलं समोर

नवी दिल्ली : बुराडीच्या संत नगरमध्ये भाटिया कुटुंबातील 11 लोकांच्या रहस्यमय मृत्यूनंतर पोलिसांच्या हाती आणखी एक डायरी लागली आहे. रोज या प्रकरणात नवीन नवीन खुलासे होत आहेत. दैनिक जागरणच्या बातमीनुसार ललित यांची भांची प्रियंकाची एक प्रायव्हेट डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यानंतर या 11 लोकांच्या मृत्यूचं प्रकरण आणखी वेगळ्याच दिशेकडे गेलं आहे. प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. अंधश्रद्धेनंतर आता प्रेम प्रकरण समोर आलं आहे. डायरीच्या कवर पेजवर सुंदर मुलगी असं लिहिलं आहे. हृद्याच्या आकाराने पहिलं पान कापलं आहे. सिल्वर पेपरने ते सजवण्यात आलं आहे.

डायरीमध्ये प्रियंकाने मॉडल टाउनमध्ये राहणाऱ्या एका युवकाबद्द्ल लिहिलं आहे. युवकासोबत मैत्री आणि संबंध याचा उल्लेख तिने डायरीत केला आहे आणि याबद्दल मामाची माफी देखील मागितली आहे. 

पोलिसांच्य़ा सूत्रांच्या माहितीनुसार, ही नवी डायरी समोर आल्य़ाने चौकशीला आणखी एक नवी दिशा मिळाली आहे. पोलीस आता त्या मुलाचा शोध घेत आहे. यानंतर या प्रकरणात आणखी काही रहस्य समोर येण्याची शक्यता आहे.