LPG Cylinder Price: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला Good News, LPG स‍िलिंडरच्या दरात मोठी घसरण

LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.  त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  

Updated: Sep 1, 2022, 08:05 AM IST
LPG Cylinder Price: सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला Good News, LPG स‍िलिंडरच्या दरात मोठी घसरण title=

मुंबई : LPG Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.  (LPG Gas Cylinder Price) दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5 रुपयांनी कमी झाले आहेत. (LPG Price in India ) इंडियन ऑइलने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर  (LPG Commercial Cylinder Price) 91.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून सिलिंडरसाठी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हा सिलिंडर 1976.50 रुपयांना मिळत होता.

आजचा नवीन दर

हा सलग पाचव्यांदा व्यावसायिक सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. मे महिन्यात विक्रमी 2354 रुपयांवर दर पोहोचला होता. आता नव्या किमतीनुसार 19 किलोचा सिलिंडर दिल्लीत 1885 झाला आहे. राजधानी दिल्लीत आता यासाठी 1976.50 ऐवजी 1885 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच कोलकात्यात 2095.50 ऐवजी 1995.50 रुपये, मुंबईत 1936.50 ऐवजी 1844 रुपये आणि चेन्नईमध्ये 2141 ऐवजी 2045 रुपये आहे. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1053 रुपयांना मिळत आहे.

19 मे 2022 रोजी 2354 रुपयांच्या विक्रमी किमतीवर पोहोचलेल्या गॅस सिलिंडरची किंमत 1 जून रोजी 2219 रुपये होती. महिनाभरानंतर सिलिंडरची किंमत 98 रुपयांनी कमी होऊन ती 2021 रुपये झाली. 6 जुलै रोजी तेल कंपन्यांनी या सिलिंडरची किंमत 2012.50 रुपये केली. 1 ऑगस्टपासून हा सिलेंडर 1976.50 रुपयांना मिळू लागला. आता 1 सप्टेंबर काहीसा सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

200 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी

गेल्या काही दिवसांत सरकारने जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.