सामान्यांना दणका, घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

 सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: May 1, 2019, 11:01 PM IST
सामान्यांना दणका, घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी  चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात महाराष्ट्रातील मतदानाचा समावेश आहे. या मतदानानंतर लगेच केंद्र सरकारने सामान्यांना दणका देण्यास सुरूवात केलेय. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे गृहीणींचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती आजपासून म्हणजे १ मे पासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सिलिंडर महाग पडणार आहे.

मुंबईमध्ये आजपासून अनुदानित एलपीजी गॅस ०.२९ पैशांनी, तर विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये ६ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईप्रमाणे दिल्लीमध्येही गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्पा होईपर्यंत गॅस किमतीत वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, आजपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

तेल कंपन्यांनी अनुदान (नॉन सबसिडी) नसलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ५ रुपयांची वाढ केली होती. तर अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत २५ पैशांची वाढ केली होती. वर्षाला १४.२ किलोचे १२ सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यानंतरच्या सिलिंडरला अनुदान दिले जात नाही.