मुंबई : तुम्हाला एलपीजी गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर सबसिडी मिळत नसेल, तर तुम्हाला एक छोटे काम करावे लागेल. हे काम पूर्ण केल्यानंतरच एलपीजी सबसिडीचे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील लागतील. याबाबतीत चांगली गोष्ट अशी की, यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याचीही गरज नाही. हे काम तुम्ही घरी बसून करू शकता. कोरोना संकटाच्या काळात सरकारने एलपीजी गॅसवरील सबसिडी बंद केली होती. हे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
एलपीजी गॅस सबसिडीचे पैसे लोकांच्या खात्यात येऊ लागले आहेत. सरकार एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात हस्तांतरित करत आहेत.
तुम्हाला जर आधी एलपीजी सबसिडीचे पैसे मिळत होते आणि आता ते मिळत नसतील, तर ते पैसे का मिळत नाहीत, हे तपासावे लागेल. एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सबसिडीचे नियम निश्चित आहेत. त्याचा लाभार्थी कोण, हेही ठरले आहे. त्यामुळे तुमची सबसिडी का थांबली हे तुम्हाला कळायला हवे.
सरकार सध्या ग्राहकांना प्रति सिलिंडर 79.26 रुपये सबसिडी देत आहे.
तुम्ही एलपीजी सिलिंडर खरेदी करत असाल आणि तुम्हाला सबसिडी आली नसेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला सबसिडी मिळतेय की नाही हे पाहावे लागेल. एलपीजी सिलिंडर दिवसेंदिवस महाग होत आहेत. अशा परिस्थितीत अनुदानामुळे सिलिंडरच्या महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. चला संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया
सर्वप्रथम mylpg.in या वेबसाइटवर जा.
यानंतर, तुम्हाला उजव्या बाजूला तिन्ही कंपन्यांच्या एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.
तुम्ही कोणत्या कंपनीचा गॅस सिलेंडर वापरता, त्याच्या फोटोवर क्लिक करा.
यानंतर एक नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची माहिती दिली जाईल.
वर उजवीकडे साइन-इन आणि नवीन वापरकर्त्यासाठी एक पर्याय असेल, तो निवडा.
तुमचा एलपीजी आयडी आधीच तयार केला असेल तर तुम्हाला साइन इन करणे आवश्यक आहे.
जर आयडी नसेल तर तुम्हाला नवीन वापरकर्ता निवडावा लागेल.
यानंतर, जी विंडो उघडेल, त्यात उजव्या बाजूला View Cylinder Booking History हा पर्याय असेल, तो निवडा.
तुम्हाला सबसिडी मिळते की नाही हे कळेल.
अनुदान न मिळाल्यास, तुम्ही १८००२३३३५५५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.
एलपीजी सबसिडी तुमच्या बँक खात्यात येत नसेल, तर याची अनेक कारणे असू शकतात. तुमचा बँक खाते क्रमांक बरोबर नसणे हे सर्वात मोठे कारण असू शकते. याचे एक कारण हे देखील असू शकते की त्यांचे आधार कार्ड एलपीजी कनेक्शनशी लिंक केलेले नाही.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे त्यांना सरकार एलपीजी सबसिडी देतनाही. त्यांना या व्याप्तीच्या बाहेर ठेवले जाते. जर तुमची कमाई 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. जर तुमचे उत्पन्न रु 10 लाखांपेक्षा कमी असेल परंतु तुमची पत्नी/पती देखील कमावत असेल आणि दोघांचे मिळून उत्पन्न रु.10 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही LPG (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सबसिडीसाठी पात्र होणार नाही.