VIDEO: भाजप आमदाराच्या पतीने टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

भाजप आमदाराच्या पतीने टोल प्लाझावर एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 28, 2017, 04:49 PM IST
VIDEO: भाजप आमदाराच्या पतीने टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण title=
Image: Video Grab (ANI)

नवी दिल्ली : भाजप आमदाराच्या पतीने टोल प्लाझावर एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओत मध्य प्रदेशातील भाजप आमदार संगीता चारेल यांचे पती विजय चारेल हे आपल्या सहकाऱ्यांसोबत एका टोल कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत. भाजप आमदाराच्या पतीची दबंगिरी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ तारखेला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रतलाम येथील सरलापाडामध्ये असलेल्या टोल प्लाझावर विजय चारेल यांची गाडी थांबवण्यात आली. त्यावेळी विजय चारेल यांनी टोल देण्यास नकार दिला.

टोल देण्यास नकार दिल्याने टोल कर्मचाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर विजय चारेल यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली.

पोलिसांच्या मते, टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे विजय चारेल आणि त्यांच्या गाडीत बसलेल्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांसोबत विजय चारेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची टोल देण्यावरुन बाचाबाची झाली. त्यानंतर मारहाण करण्यात आली. सर्व आरोपी टोल बूथमध्ये गेले आणि टोल प्रभारी अजय खाती यांच्यासोबत तीन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली.