बंगळुरु : कर्नाटकमध्ये सध्या राजकीय नाट्य रंगलं आहे. संपूर्ण देशाचं लक्ष कर्नाटकच्या या सत्ता संघर्षाकडे लागलं आहे. भाजप, काँग्रस आणि जेडीएसममध्ये सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. दोन्ही बाजुने सत्तेचा दावा करण्यात येत आहे. कर्नाटकात हे सगळ्या राजकीय घडामोडी सुरु असतांनाच महाभारतातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाभारतात जेव्हा पांडव आणि कौरवांमध्ये युद्ध होणं निश्चित झालं होतं. तेव्हा अर्जुन आणि दुर्योधन दोन्ही श्रीकृष्णकडे जातात. दुर्योधन श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन बसतो आणि अर्जुन कृष्णाच्या पायाजवळ जाऊन बसतो. श्रीकृष्ण जेव्हा झोपेतून उठतात तेव्हा त्यांची नजर आधी अर्जुनावर जाते पण दुर्योधन त्यांना आधी भेटायला आलेला असतो. कर्नाटकची वर्तमान स्थितीशी हा सीन जोडला जात आहे.
Karnataka governor. pic.twitter.com/lpL9OpLj9J
— (@AndColorPockeT) May 15, 2018
मंगळवारी कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला. ज्यामध्ये भाजपला 104 तर जेडीएसला 38 आणि काँग्रेसला 78 जागा मिळाल्या. काँग्रेसने संधी साधत जेडीएसला समर्थन घोषित केलं. यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे नेते भाजप नेत्यांच्या आधी राज्यपालांना भेटण्यासाठी जातात. पण संपूर्ण निकाल लागलेला नसल्याने त्यांनी सुरुवातीला त्यांची भेट नाकारली. पण नंतर भाजपचे येदियुरप्पा त्यांना भेटण्यासाठी जातात आणि आधी ते सत्ता स्थापनेचा दावा करतात.