Petrol Price Today: राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रुडच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर आज मात्र किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $81.42 वर पोहोचली.

Updated: Sep 30, 2022, 08:46 AM IST
Petrol Price Today: राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त? जाणून घ्या आजचे दर title=

Petrol-Diesel Price Today 30th September : गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी त्याच्या दरात किंचित वाढ झाली. परिणामी क्रूडच्या किमतीत घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. (maharashtra petrol and diesel price on 30 september 2022)

सरकारने चार महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किंमतीवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर दरात बदल करण्यात आला होता. त्यावेळी देशभरात किंमत बदलली होती. यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्येही तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. 1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder rate) दरात कपात केली होती.

मात्र आता 1 ऑक्टोबरला गॅसच्या किमतीतही बदल अपेक्षित आहे. मात्र आजच्या दरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

देशातील चार प्रमुख मेट्रो शहर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel rate)  दर जैसे थेच आहेत आणि लोकांना कालच्या किमतीत इंधन मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होतात, याची सर्वसामान्य जनता प्रतीक्षा करत आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 

दिल्ली - पेट्रोल 96.72 प्रति लिटर, डिझेल 89.62 प्रति लिटर
चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये, डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त?

महाराष्ट्रातील परभणीत सध्याचा पेट्रोलचा दर  109.47 रुपये आणि डिझेलचा दर 95.86  रुपये प्रति लिटर आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.70 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 93.23 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 106.99  रुपये आणि डिझेलचा दर 93.47  रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.42 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 107.62 रुपये आणि डिझेलचा दर 94.08 प्रति लिटर इतका आहे

इंधन दर कसे पाहाल? 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price) मोबाइलवरही इंधन दर पाहता येतील. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.