महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणारे सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत तरी कोण?

Who is CJI Chandrachud : अयोध्या राम जन्मभूमीपासून, अनुच्छेद 377, सबरीमला अशा एक ना अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका. दोन Special Child चे वडील ते भारताचे सरन्यायाधीश... 

सायली पाटील | Updated: May 11, 2023, 01:37 PM IST
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणारे सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत तरी कोण?  title=
Maharashtra political crisis SC hearing MLA Disqualification hearing justice dy chandrachud who played major role in verdict

Who is CJI Chandrachud : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना पाच न्यायाधीशाच्या घटनापीठानं अतिशय ऐतिहासिक निरीक्षणं नोंदवली. शिंदे सरकारला दिलासा देत राज्यात त्यांचं सरकार अबाधित ठेवलं असलं तरीही तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेले बहुतमतचाचणीचे आदेश अयोग्य असल्याचं म्हणत न्यायमूर्तींनी राज्यपालांचेच कान टोचले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता, तर राज्यात ठाकरे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकलं असतं असंही निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतचं चित्र काही अंशी स्पष्ट झालं. 

Maharashtra political crisis संदर्भातील या निर्णयादरम्यान सीजेआय चंद्रचूड यांनी पुन्हा एकदा सुनावलेला निकाल यंत्रणांचे कान टोचणारा आणि लोकशाहीला एका नव्या मार्गावर नेणारा ठरलाय. या सुनावणीनंतर अनेकांनीच सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कारकिर्दीबाबत जाणून घेण्यासाठी काही प्रश्न उपस्थिती केले. चला तर, पाहुया CJI Chandrachud आहेत तरी कोण... 

CJI Chandrachud यांच्या नावे मोठ्या निर्णयांची नोंद 

DY chandrachud अर्थात धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश असून, त्यांच्यासाठी कायदा, न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या गोष्टी नव्या नाहीत. कारण, त्यांचे वडिलही यशवंत विष्णू चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वाधिक म्हणजेच 7 वर्षांहूनही अधिक काळासाठी कार्यरत होते. 

कोणकोणत्या निकालांमध्ये CJI Chandrachud यांचं मोलाचं योगदान? 

29 मार्च 2000 ते 31 ऑक्टोबर 2013 या काळात न्यायमूर्ती चंद्रचूड मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी होते. त्यानंतर अलाहबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

आतापर्यंतच्या कारकिर्दीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बऱ्याच ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या घटनापीठ आणि खंडपीठांमध्ये मोठं योगदान दिलं आहे. अयोध्या राम जन्मभूमी वाद, अनुच्छेद 377, समलैंगिक संबंधांना गुन्ह्यांच्या श्रेणीतून बाहेर काढण्यापासून आधार योजनेच्या वैधतेच्या मुद्द्यांवरील निकालांमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. लष्करातील महिला अधिकाऱ्याचं योगदान, सबरीमला वाद या आणि अशा इतरही मुद्द्यांवरील निरीक्षण, निकालांमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड लक्षवेधी मतं नोंदवली. 

कारकिर्दीत यशशिखरावर असणाऱ्या सीजेआय चंद्रचूड यांनी वाईट दिवसही पाहिले... 

2007 मध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला गमावलं. त्यांच्या पत्नी रश्मी यांची कर्करोगाशी सुरु असणारी झुंज अपयशी ठरली आणि त्या पती, दोन मुलांना मागे सोडून या निघून गेल्या. पहिल्या पत्नीला गमावलेल्या CJI Chandrachud यांनी पुढे काही वर्षांनी कल्पना दास यांच्याशी लग्न करत एका नव्या आय़ुष्याची सुरुवात केली. 

हेसुद्धा वाचा : मुली म्हणजे सर्वस्व; आयुष्यानं आघात करुनही समाजापुढे पायंडा घालणाऱ्या CJI Chandrachud यांच्या कुटुंबाचे Photos

CJI Chandrachud यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं असून, तीसुद्धा वकिलीच्या क्षेत्रात वडिलांचं नाव मोठं करताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या पत्नीसोबतच्या नात्यात न्यायमूर्तींनी शारीरिक व्यंग (Special Child) असणाऱ्या दोन मुली दत्तक घेतल्या. माही आणि प्रियंका अशी त्यांच्या मुलींची नावं. मुलींना दत्तक घेत त्यांची जबाबदारी स्वीकारण्याच्या त्यांच्या या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत झालं. शिवाय सरन्यायाधीश असण्यासोबतच कुटुंबाला प्राधान्य देणारं व्यक्तीमत्त्वं अशीही दुसरी बाजू त्यांनी कायमच सर्वांसमोर आणल्यामुळं सीजेआय चंर्दचूड अनेकांनाच आदर्शस्थानी आहेत.