काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

दक्षिण काश्मीर भागातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झालेत.

Updated: Aug 13, 2017, 06:44 PM IST
काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

शोपियान : दक्षिण काश्मीर भागातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झालेत. शहीद जवानांनमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र सुमेध गवई यांना वीरमरण आलंय. सुमेध गवई हे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच लोणाग्रा गावावर शोककळा पसरली आहे.

शनिवारी रात्रीपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका कॅप्टनसह अन्य तीन जण जखमी झालेत. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलंय. तर या चकमकीत भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्याना कंठस्नान घातलंय.

दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. हे तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे असल्याचे समजतंय. शोपियान जिल्ह्यातल्या झैनापोरा भागात अवनीरा गावात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. अजूनही या परिसरात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे.