दुर्दैव ज्याला म्हणतात ते हेच का? व्हिडीओ पाहून उडेल तुमचाही थरकाप

सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात. जे आपलं मनोरंजन करतात. परंतु काही व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात.

Updated: Aug 10, 2022, 07:59 PM IST
दुर्दैव ज्याला म्हणतात ते हेच का? व्हिडीओ पाहून उडेल तुमचाही थरकाप title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात. जे आपलं मनोरंजन करतात. परंतु काही व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या पोटात गोळा येईल. हो, या व्हिडीओतील तरुणासोबत त्याच्या हलगर्जीपणामुळे विचित्र घटना घडते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुचाकी मागे घेण्याच्या प्रयत्नात तो तरुण बाईकसोबत खड्यात पडतो. 

ही छोटी क्लिप रविवारी ट्विटरवर 'व्हाय मेन लिव्ह लेस' नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आली. पोस्ट पाहिल्यानंतर नेटिझन्सनी त्याच्यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. परंतु हे मजेदार वाटत असलं तरी खूप गंभीर गोष्ट आहे. गाडी चालवताना तुमचं लक्ष थोडं जरी विचलित झालं तरी तुमच्यासोबत काय घडू शकतं याचं हे एक उदाहरण आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत 1.2 मिलियन पेक्षा जास्त म्हणजेच 12 लाख वेळा पाहिला गेला आहे. धक्कादायक व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, माणूस हळू हळू त्याची बाईक मागे घेत असतो, पण त्याच्या मागे मोठा खड्डा आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. ज्यामुळेच तो बाईक मागे घेताच त्याचा तोल जातो आणि तो व्यक्ती गाडीसोबत त्या खड्यात पडतो.

या तरुणाचं पुढे काय झालं हे तर कळू शकलेलं नाही, परंतु हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण आहे. त्यामुळे या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने केलेली चुक तुम्ही करु नका आणि नेहमी सावध राहा.