Cooking Tips in Marathi : भजी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर भज्यांचे विविध प्रकार दिसतात. कांदा भजी, बटाट्याची भजी, मूगडाळ भजी या खूप आवडीने खातो. गरमागरम, कुरकुरीत, खमंग भजी पाहिली किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. गरमागरम भजी आणि वाफळेला चहा यापेक्षा वेगळ स्वर्ग काही नाही. कधी-कधी रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी चटपटीत खाण्याचा मोह होतो. अशा वेळी भजी सर्वांच्या आवडत्या खाद्यपदार्थाप्रमाणे घरीच बनवून खातो. (how to make crispy and oily free bhaji recipe )
पण भजी जितकी खायला आवडते तितकीच तळून काढल्यानंतर तेलकट दिसते. एका चमकदार, मसालेदार पदार्थ म्हटले तर तेल हा प्रकार राहणारचं. अशावेळी काही लोक भजी खाणे टाळतात. त्याचे कारण म्हणजे भजीचा पदार्थ तेलातून तळून तयाप होतो. त्यामुळे कॅलरीज वाढण्याची शक्यता खूप असते. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही, अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे भजी कमी तेलकट आणि कुरकुरीत भजी तुम्ही खाऊ शकता.
कमी तेलकट करण्यासाठी भजी बनवण्यासाठी पिठात योग्य प्रमाणात साहित्य वापरणे आवश्यक आहे. यासाठी एका भांड्यात बेसन आणि मसाले एकत्र करा. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून मिक्स करावे. बॅटर जास्त पातळ किंवा जडसर नसावे. आता त्यात भजी डिप करुन पाहावे, त्याला बॅटर कोट होत आहे की नाही ते चेक करा. त्यानंतर त्यात 3 ते 4 थेंब तेल मिसळा. या ट्रिकमुले भजी जास्त तेल शोषणार नाही.
भजीच जास्त तेल राहत असेल तर त्याला भांडपण कारणीभूत ठरु शकते. भजी तळण्यासाठी जाड तळाचे भांडे वापरा. त्यामुळे तेलाचे तापमान स्थिर राहते आणि भजी जास्त तेल शोषून घेत नाही.
भजी कुरकुरीत व्हावीत म्हणून लोक कढईत जास्त तेल टाकतात. तेल नीट गरम केले नाही तर भजी जास्त तेल शोषून घेते. भजी तळताना तेल लवकर संपते. तेल नसल्यामुळे भजी एकमेकांना चिकटतात. त्यामुळे भजी जास्त तेल शोषून घेते. म्हणूनच भजी तळण्यासाठी जास्त तेल घाला आणि व्यवस्थित गरम करा. तव्यातून भजी बाहेर काढल्यानंतर नॅपकीनवर ठेवा. त्यामुळे भजीतलं अतिरिक्त तेल निघून जाईल.