Crime News In Marathi: बिहारच्या खगडिया शहरात अंगावर काटा आणणारी एक घटना घडली आहे. एका माथेफिरु नवऱ्याने त्याच्या पत्नीसह तीन मुलींचा निर्घृणपणे खून केला आहे. नवऱ्याने रागाच्या भरात हा गुन्हा केल्याचं बोललं जात आहे. तसंच, पोटच्या मुलींना आणि पत्नीचा जीव घेतल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपीचे नाव मुन्ना यादव असे आहे. (Man Killed Wife And 3 daughter)
आरोपी मुन्ना यादव जेव्हा त्याच्या पत्नी व मुलींची हत्या करत होता. तेव्हा त्याची अन्य दोन मुले घरातील गच्चीवर झोपला होता. घरातील किंकाळ्यांचा आवाज ऐकून ते झोपेतून उठले व त्यांनी घराच्या गच्चीवरुनच आत वाकून पाहिले तेव्हा ते भयंकर दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांचे वडिलच आई आणि बहिणींची गळा चिरुन हत्या करत होती. दे दृश्य पाहून ते घाबरले व लगेचच गच्चीवरुन दुसऱ्या घराच्या छतावर उडी मारली व तिथेून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस लगेचच तिथे पोहोचले. पोलिसांनी आरोपीच्या दोन्ही मुलांचीही चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना यादन पहाटे जवळपास तीन वाजताच्या सुमारास घरी आला होता. घरी येताच पत्नीसोबत त्याचे भांडण झाले होते. त्याचवेळी त्याने रागात पत्नीचा गळा चिरला. आईची ही अवस्था पाहून त्यांच्या तिन्ही मुलींनी घाबरुन आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळं आधीच रागात असलेल्या मुन्नाने तिन्ही मुलींचीदेखील हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना यादव एका हत्या प्रकरणात आरोपी होती. पोलिस खूप दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. मात्र तो फरार होता. बुधवारी पोलिसांपासून लपत-छपत तो घरी आला होता. मुन्ना यादव घरी येताच त्याची पत्नी त्याला पोलिसांसमोर सरेंडर होण्याची मागणी करत होती. पत्नीची मागणी ऐकून तो संतापला होता. त्यावरुनच त्यांच्यात भांडण झाले. बायकोचीच आपल्याला अटक व्हावी ही इच्छा आहे, असा गैरसमज त्याने करुन घेतला होता. त्यामुळं संपाताच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली. आरोपी मुन्ना यादवचा मुलगा याने पोलिसांच्या चौकशीत हे नमूद केलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही मुलं घटनास्थळावरुन पळून गेली नसती तर त्याने त्यांचीही हत्या केली असती, असं आरोपीच्या मुलांने पोलिसांच्या जबाबात सांगितलं आहे. पोलिस या प्रकरणी अधित तपास करत आहेत. तसंच, फॉरेंसिक टीमला देखील घटनास्थळी बोलवून घेतलं आहे. हत्या नेमकी कशामुळं झाली, हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.