Manali trip - हिमाचल प्रदेश हा भारतीयांसोबत परदेशी पर्यटकांना भुरळ घालतो. हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन हे पर्यटकांना आकर्षित करत असतात. हिमाचल प्रदेश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं ते मनाली. नयनरम्य अशा डोंगऱ्यात वसलेलं या शहराचा उल्लेख महाभारतात देखील झाला आहे. मनालीमध्ये असलेलं पुरातन मंदिर आहे ज्याचा उल्लेख महाभारताशी जोडलेलं आहे.
हिडिम्बा मंदिर हे ढुंहरी शहरात असल्याने याला ढुंगरी मंदिर या नावाने देखील ओळखलं जातं. या मंदिराचा इतिहास हा महाभारताशी जोडलेला आहे. असं म्हणतात मनाली शहरातून भीम आणि पांडव कुठे तरी जात होते. त्यावेळी त्यांनी या जागेची जबाबदारी भीम यांची पत्नी हिडिम्बेला दिली. त्यानंतर हिडिम्बाला पुत्रप्राप्ती झाली. मग तिने या जागेची जबाबदारी पुत्राला दिली आणि हिडिम्बा तपस्यासाठी जंगलात निघून गेली. म्हणून तिच्या स्मृतीमध्ये या मंदिराची निर्मीती करण्यात आली. राजा बहादुर सिंह यांनी या मंदिराची निर्मीती केलं असं म्हटलं जातं.
पौराणिक कथेत म्हटलं जातं की, हिडिम्बा आपल्या भावासोबत या जागेवर राहत होती. हिडिम्बाला आपल्या भावाच्या शौर्यावर खूप गर्व होता. असं म्हणतात हिडिम्बाने म्हटलं होतं की, माझ्या भावाला युद्धा जो हरवेल मी त्याचाशी लग्न करेल. पौराणिक कथेनुसार भीम आणि पांडव इथे विश्रातीसाठी काही काळासाठी थांबले होते. त्यावेळी भीम आणि हिडिम्बाच्या भावामध्ये युद्ध झाले आणि या युद्धात हिडिम्बाच्या भावाचा पराभव झाला. या युद्धानंतर भीम आणि हिडिम्बाचं लग्न होतं.
- हे मंदिर लाकड्याने बनवलं असून पॅगोडा शैलीत बांधले गेले आहे. तर या मंदिराच्या भिंती या दगडाने बनवल्या आहेत.
- या मंदिराच्या भिंतीवर असलेली सुंदर अशी शिल्पकला पर्यटकांचं लक्ष वेधून घेते.
- मंदिराचं प्रवेशद्वार हे लाकडाचं असून त्यावर हाताने प्राण्याचं चित्र रेखाटलं आहे.
- हे मंदिर घनदाट झाड्यांचा मध्ये उभ असल्याने या मंदिराची अजून शोभा वाढवतं.