मुंबई : Marriage News : आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मुलीच्या लग्नाचे वय काय असावे, यावर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. लग्नाचे वय 18 वर्षांवरुन 16 वर्षे करण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा मागे पडली आणि लग्नाच्या वय 18 वर्षेच ठेवण्यात आले. आता पुन्हा मुलीच्या लग्नाचे वय वाढविण्याचा विचार आहे. (Cabinet clears push to raise marriage age of women from 18 to 21)
मुलींच्या लग्नाचे किमान वय 21 होण्याची शक्यता आहे. मुलींच्या लग्नाचे वय 18 वरुन 21 करण्याची हालचाल सुरु झाली आहे. विवाह कायद्यात सुधारण्यात येणार आहे. सुधारणांचे विधेयक कॅबिनेट बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे, अशी माहिती हाती आली आहे.
त्यामुळे मुलींच्या लग्नाचे किमान वय आता 21 होण्याची शक्यता आहे. तरुणींच्या लग्नाचे वय सद्यस्थितीत 18 आहे. मात्र ते बदलून 21 करण्याचा सरकारचा विचार आहे. तरुण आणि तरुणींसाठी लग्नाचं किमान वय एकसमान म्हणजेच 21 वर्षे असावे, असा विचार आहे. त्यासाठी याबाबत सुधारणांचे विधेयक कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे.