नवी दिल्ली : देशातल्या उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त बंदूक ठेवण्याचे लायसन्स आहे. उत्तर प्रदेशमध्ये १२.७७ लाख लोकांकडे बंदूक बाळगण्याचं लायसन्स आहे. गृहमंत्रालयानं ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतची बंदूक बाळगण्याचं लायसन्स असण्याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशामध्ये बंदुकांचं लायसन्स असणाऱ्यांची संख्या ३३,६९,४४४ एवढी आहे. यामध्ये एकट्या उत्तर प्रदेशमध्ये १२,७७,९१४ जणांकडे बंदुकीचं लायसन्स आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीरचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमध्ये ३,६९,१९१ जणांकडे बंदुकीचं लायसन्स आहे.
बंदुकांचं लायसन्स असणाऱ्यांमध्ये पंजाबचा तिसरा क्रमांक लागतो. पंजाबमध्ये ३,५९,३४९ जणांकडे बंदुकीचं लायसन्स आहे. या यादीमध्ये मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर, हरियाणा चौथ्या क्रमांकावर, राजस्थान पाचव्या क्रमांकावर, कर्नाटक सहाव्या क्रमांकावर, महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे.
बंदुकीची सर्वाधिक लायसन्स असणारी राज्य
उत्तर प्रदेश- १२,७७,९१४
जम्मू काश्मीर- ३,६९,१९१
पंजाब- ३,५९,३४९
मध्य प्रदेश- २,४७,१३०
हरियाणा- १,४१,९२६
राजस्थान- १,३३,९६८
कर्नाटक- १,१३,६३१
महाराष्ट्र- ८४,०५०
बिहार- ८२,५८५
हिमाचल प्रदेश- ७७,०६९
उत्तराखंड- ६४,७७०
गुजरात- ६०,७८४
पश्चिम बंगाल- ६०,५२५
दिल्ली- ३८,७५४
नागालँड- ३६,६०६
अरुणाचल प्रदेश- ३४,३९४
मणीपूर- २६,८३६
तामीळनाडू- २२,५३२
ओडिसा- २०,५८८
दीव दमण- १२५
दादरा-नगर हवेली- १२५