OTC Drug Policy: आता प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार औषधं? सरकार का करतंय याबाबत विचार?

Over The Counter Drug Policy: भारत सरकारडून स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडून OTC म्हणजेच ओव्हर द काउंटर ड्रग पॉलिसीबाबत चर्चा केली जातेय. खोकला, सर्दी आणि तापाची औषध खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत सहज पोहोचवता यासाठी हा विचार केला जातोय. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 18, 2024, 09:54 AM IST
OTC Drug Policy: आता प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार औषधं? सरकार का करतंय याबाबत विचार? title=

Over The Counter Drug Policy: आजकाल अनेक औषधं ही ओव्हर द काऊंटर विकत घेतली जातात. मात्र औषधांच्या खरेदीसाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे. मात्र खोकला, सर्दी आणि तापाची औषधं इतर अनेक देशांप्रमाणे भारतातही जनरल स्टोअरमध्ये उपलब्ध असावीत का? दरम्यान याबाबत भारत सरकारकडून स्थापन केलेली समिती यावर विचार करत असल्याची माहिती मिळतेय.

भारत सरकारडून स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडून OTC म्हणजेच ओव्हर द काउंटर ड्रग पॉलिसीबाबत चर्चा केली जातेय. खोकला, सर्दी आणि तापाची औषध खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत सहज पोहोचवता यासाठी हा विचार केला जातोय. यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.

प्रिस्क्रिप्शन विना कोणत्या देशांमध्ये मिळतात औषधं?

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अमेरिकेसारख्या अनेक देशांनी सर्दी आणि ताप यासारख्या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या विक्रीला अगदी जनरल स्टोअरमध्ये परवानगी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ओव्हर द काउंटर ड्रग पॉलिसीकडे पाहणाऱ्या काही तज्ज्ञांनी गावात राहणाऱ्या लोकसंख्येला लक्षात घेऊन हे धोरण बदललं पाहिजे असं सुचवलंय. दरम्यान याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये ओव्हर द काउंटर ड्रग पॉलिसीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वं आहेत.

यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आरोग्य सेवा महासंचालक अतुल गोयल यांनी भारताचे OTC औषध धोरण तयार करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली होती. या समितीने प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्या जाणाऱ्या औषधांची पहिली यादी नुकतीच सादर केली असून, त्यानंतर सोमवारी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आलेली होती. भारतात प्रिस्क्रिप्शन औषधांसाठी नियम आहेत परंतु प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्या जाणाऱ्या औषधांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा यादी अद्याप नाही.