नवी दिल्ली : लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज सोनिया गांधींची भेट घेतली. उद्या विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक होणार असून यामध्ये कोविंद यांच्याविरोधात उमेदवार देण्याबाबत निर्णय होऊ शकतो. अद्याप काँग्रेसच्या गोटातून कोणाचंच नाव घेतलं गेलं नसलं, तरी मीरा कुमार यांनी सोनियांची भेट घेतल्यामुळे राजधानीमध्ये चर्चांना उधाण आलंय.
पंतप्रधान मोदींनी खेळलेल्या दलित कार्डला उत्तर म्हणून काँग्रेसही दलित उमेदवार उतरवेल, अशी शंका सुरूवातीपासूनच व्यक्त केली जात होती. मात्र संयुक्त जनता दल आणि बिजू जनता दलानं कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे विरोधकांमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. अशा स्थितीत उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.