जम्मू-काश्मीर : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या काश्मीरातील जमात ए इस्लामी संघटनेचा मेहबुबा मुफ्ती यांना पुळका आला आहे. संघटनेची बंदी हटवण्यासाठी मेहबुबा यांची अनंतनागमध्ये निदर्शने करत आहेत. जमात ए इस्लामी या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यावर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सईद यांना संघटनेचा पुळका आला आहे. ही बंदी उठवावी यासाठी मेहबुबा यांनी अनंतनागमध्ये निदर्शनं केली. बंदी तातडीने उठवावी, अशी मागणी सईद यांनी केली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने कडक धोरण अबलंबले आहे. त्यानंतर पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण ठिकाणांवर भारताने हवाई हल्ला चढवला. तेथील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. त्यानंतर भारताने देशात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या संघटनांना निशाण्यावर ठेवले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करण्यात येणाऱ्या संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यात जमात ए इस्लामी संघटनेचा समावेश आहे.
J&K: Mehbooba Mufti and PDP workers protest in Srinagar against the ban on Jamaat-e-Islami (Jammu & Kashmir) by the Central Government. pic.twitter.com/zvCceAKQOa
— ANI (@ANI) March 2, 2019
दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्यासाठी सारी यंत्रणा कामाला लागलीय. याच कारवाईचा भाग म्हणून काश्मीरच्या पोलिसांनी आणि ४४ राष्ट्रीय रायफलनं संयुक्त कारवाई करत शोपियानमधल्या कुंगनू गावात दहशतवाद्यांचं बंकर शोधून काढलंय. या बंकरमधून स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आलांय. या भागात दहशतवाद्यांची अशीच अजून बंकर्स आहेत का याचा कसून शोध काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफलचे जवान घेत आहेत.