Viral Story : 'मेरे बाबूने केक खाया', Valentine's Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल

Valentine Day Special Menu Card : राजा बेकरी नावाच्या एका बेकरी मालकाने वेलेंटाईन वीक (Valentine Weak) निमित्त खास मेन्यू कार्ड (Menu Card viral) बाजारात आणला आहे. हा मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. या मेन्यू कार्डमध्ये गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक, पहला प्यार केक, एक तरफा प्यार केक, प्यार में धोका केक, हरामी दोस्ती केक, सिंगल के लिए केक आणि बॉयफ्रेंड केक यासह विविध प्रकारच्या केकची नावे लिहली आहेत. 

Updated: Feb 9, 2023, 06:39 PM IST
Viral Story : 'मेरे बाबूने केक खाया', Valentine's Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल

Valentine Day Special Menu Card : देशभरात सध्या वेलेंटाईन वीक (Valentine Weak) साजरा केला जात आहे. या वेलेंटाईन वीकमध्ये तरूणाई चांगलीच हरवली असून प्रत्येक दिवस साजरा करत आहे. या वेलेंटाईन वीक निमित्त एका केक शॉपच्या (Cake Shop) मालकाने अनोखे केक बाजारात आणले आहेत. या प्रत्येक केकचे नाव खुपच हटके आहे.  तसेच या केकचे शॉपचा मेन्यू कार्ड (Menu Card viral)देखील व्हायरल झाला आहे. या मेन्यू कार्डची आता सोशल मीडियावर चर्चा आहे. 

मेन्यू कार्डमध्ये काय? 

राजा बेकरी नावाच्या एका बेकरी मालकाने वेलेंटाईन वीक (Valentine Weak) निमित्त खास मेन्यू कार्ड (Menu Card viral) बाजारात आणला आहे. हा मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. या मेन्यू कार्डमध्ये गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक, पहला प्यार केक, एक तरफा प्यार केक, प्यार में धोका केक, हरामी दोस्ती केक, सिंगल के लिए केक आणि बॉयफ्रेंड केक यासह विविध प्रकारच्या केकची नावे लिहली आहेत. या केकची नाव खुपच हटके आहेत.

केकची किंमत किती? 

या मेन्यू कार्डमध्ये केकची रक्कम देखील लिहली आहे. यामध्ये वन साइडेड लव्ह केक, प्यार में धोका केक, हरामी दोस्ती केक आणि सिंगल के लिए केक हे केक 250 ग्रॅमसाठी 149 रुपयांना मिळत आहेत, तर 500 ​​ग्रॅमसाठी या केकची किंमत 298 रुपये आहे. 

गर्लफ्रेंड केक आणि मेरा बाबू केकची किंमत 250 ग्रॅमसाठी 175 रुपये आणि 500 ​​ग्रॅमसाठी 349 रुपये आहे. पेहला प्यार केक आणि बॉयफ्रेंड केक हे मेनूमधील सर्वात महागडे केक आहेत, ज्याची किंमत 250 ग्रॅमसाठी 200 रुपये आणि 500 ​​ग्रॅमसाठी 399 रुपये आहे. तसेच या मेन्यू कार्डमध्ये (Menu Card viral) पत्नी पिडित केक देखील आहे, मात्र त्यांची किंमत दिसत नाहीये. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हे मेन्यू कार्ड (Menu Card viral) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. "बॉयफ्रेंड केक सर्वात महागडा आहे, असे एका युझरने म्हटलेय. "हे सर्व केक, आणि तरीही तू माझ्या हृदयाचे तुकडे केलेस', असे दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे. तर तिसऱ्या युझरने ''बॉयफ्रेंड केक गर्लफ्रेड केक पेक्षा महागडा का आहे'', तर एकाने "ब्रेकअप केक विसरला" असल्याची आठवण करून दिली. 

दरम्यान राजा बेकरीचे हे मेन्यु कार्ड (Menu Card viral) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. या मेन्यू कार्डवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडतायत.