INS Vikrant MIG 29K: भारतीय नौदलाने (Indian Nevy) बुधवारी रात्री इतिहास रचला आहे. रात्रीच्या अंधारात पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेवर म्हणजेच आयएनएस विक्रांतवर (INS Vikrant) मिग-29 के (MIG 29K) हे लढाऊ विमान उतरलं. भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. नौदलाने याचा व्हिडिओ (Viral Video) देखील शेअर केलाय. ऐतिहासिक कामगिरीमुळे सध्या भारतीय नौदलाचं जगात कौतूक होताना दिसतंय. आत्मनिर्भर भारताच्या अभियान अंतर्गत भारतीय नौदलाने हा भीमपराक्रम केलाय.
आयएनएस विक्रांत या विमानवाहून युद्ध नौकेवर MIG 29K हे लढाऊ विमान यशस्वीरित्या (MiG-29K Fighter Jet Landing on INS Vikrant) लँड झालं. इंडियन नेव्हीने पहिलं नाईट लँडिंग हाती घेऊन आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्यामुळे आत्मनिर्भरताकडे नौदलाची प्रेरणा दर्शवतो, असं ट्विट नौदलाच्या प्रवक्तांकडून करण्यात आलं आहे.
आणखी वाचा - कूनो नॅशनल पार्कमधून पुन्हा वाईट बातमी, चित्याच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू
चाचणी ही आव्हानात्मक नाईट लँडिंग (Night Landing) विक्रांत क्रू आणि नौदल वैमानिकांचा संकल्पाचा परिणाम आहे. नौदलाचा हा पराक्रम कौशल्य आणि व्यावसायिकता दर्शवते, असंही ट्विट करण्यात आलंय. शनिवारी मिग 29K आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या लढाऊ नौकेवर उतरलं. कारवार येथील नेव्हल बेसवर ही नौका तैनात होती.
#IndianNavy achieves another historic milestone by undertaking maiden night landing of MiG-29K on @IN_R11Vikrant indicative of the Navy’s impetus towards #aatmanirbharta.#AatmaNirbharBharat@PMOIndia @DefenceMinIndia pic.twitter.com/HUAvYBCnTH
— SpokespersonNavy (@indiannavy) May 25, 2023
सध्या भारतीय नौदलाकडे 44 एकूण MIG 29K हे लढाऊ विमान आहे. त्यांची लांबी 56.9 फूट आणि उंची 14.5 फूट आहे. त्याचा कमाल वेग 2200 किलोमीटर प्रति तास आहे. 1500 किलोमीटरची रेंज आहे. अंतर्गत इंधन क्षमता 3500 किलो असलेलं हे विमान शस्त्रास्त्रांसह लढाऊ गटात 850 किमीपर्यंत मारक आहे. त्याचबरोबर कमाल 57,400 फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन देखील भारतासमोर दबकून राहतात.
दरम्यान, आयएनएस विक्रांतच्या रुपाने भारताला मोठी समुद्री सुरक्षा मिळाली आहे. मोठी युद्धनौका असलेल्या निवडक देशांच्या यादीत अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशांसह भारत सामिल आहे. 262 मीटर लांब, 62 मीटर रुंदी असलेलं हे जहाज 28 समुद्री मैल ते 7500 समुद्री मैलपर्यंतचं अंतर पार करू शकतं. प्रत्येकी 30 टन वजनाची 30 विमानं वाहून नेण्याची शमता या युद्धनौकीची आहे.