'वाहन चालवताना मोबाईलचा वापर बेकायदेशी नाही'

न्यायालयाच्या या आदेशामुळं पोलिसांच्या मोबाईल फोन विरोधी अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Updated: May 17, 2018, 07:53 PM IST
'वाहन चालवताना मोबाईलचा वापर बेकायदेशी नाही' title=

तिरुअनंतपुरम : वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं बेकायदेशीर नसल्याचा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयानं दिलाय. जोपर्यंत ड्रायव्हिंगमुळं लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणू शकत नाही, असं केरळ न्यायालयानं स्पष्ट केलंय. कोच्ची येथील संतोष एम. जे. या नागरिकानं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निष्कर्ष काढलाय. वाहन चालवताना संतोष फोनवर बोलत असल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मोटार वाहन अधिनियमात कुठंही मोबाईल फोनच्या वापराबद्दल उल्लेख केलेला नाही, याकडं न्यायालयानं लक्ष वेधलं. न्यायालयाच्या या आदेशामुळं पोलिसांच्या मोबाईल फोन विरोधी अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

नागरिकांनो, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं बेकायदेशीर नसलं तरी असं करताना आपल्या जीवाला धोका पोहचणार नाही, याची काळजी मात्र तुम्हालाच घ्यायचीय.