दिलासादायक ! भारतात लवकरच मॉर्डना व्हॅक्सिन

भारतासाठी दिलासादायक बातमी आहे.

Updated: Jun 29, 2021, 05:17 PM IST
दिलासादायक ! भारतात लवकरच मॉर्डना व्हॅक्सिन title=

मुंबई : भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI ने भारतात आप्तकालीन वापरासाठीच्या आयातीला मंजूरी दिली आहे. फार्मा कंपनी सिप्लाने (Cipla Pharmaceutical company) वॅक्सीनच्या आयातीसाठी आणि वितरणासाठीची परवानगी मागितली होती. अमेरिकी फार्मा कंपनी मॉर्डनाने ही कोरोना लस तयार केली आहे. ही मॉर्डना लस 94 टक्के प्रभावशील असल्याचं म्हटलं जात आहे. (Moderna vaccine will be available in India soon DCGI allows Cipla to import)

सिपलाने सोमवारी मॉर्डनाच्या आयात आणि वितरणासाठी परवानगी मागितली होती. सिप्लाने 15 एप्रिल आणि 1 जूनच्या DCGIच्या नोटीसीचा हवाला दिला आहे. नोटीसमध्ये म्हटलंय की, वॅक्सीनच्या आपत्कालीन वापराच्या अधिकारासाठी (EUA)  अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून  (FDA)  परवानगी दिली जाते, तर लसीला विना ब्रिजिंग ट्रायलशिवाय वापर आणि वितरणाचे अधिकार दिले जाऊ शकतात.

 
मॉर्डनाने मंगळवारी सांगितलं की, "अमेरिका सरकारने भारताला वापरासाठी कोवॅक्सच्या माध्यमातून कोव्हिड वॅक्सीनच्या ठराविक मात्रा दान करण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे. तसेच या लसींसाठी केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेकडून (CDSCO) मंजूरी मागितली आहे." 

 

दुसरी परदेशी व्हॅक्सीन

मॉर्डना लस ही भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली दुसरीच परदेशी लस आहे. याआधी भारताने 12 एप्रिलला रशियाच्या स्फूटनिक व्ही (Sputnik V) लसीला परवानगी मिळाली होती.      

संबंधित बातम्या : 

डेल्टा प्लसनंतर आता Lambda Variant चा धोका, आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा 

राज्यात 'या' जिल्ह्यात 3 बालकांना डेल्टा प्लसची लागण