कधी मुलायम यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात, आज मोदी सरकारमध्ये आहेत मंत्री, पाहा कोण आहे ते?

कधी मुलायम सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. ते कोण आहेत, याचीच चर्चा होत आहे.

Updated: Jul 8, 2021, 01:07 PM IST
कधी मुलायम यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात, आज मोदी सरकारमध्ये आहेत मंत्री, पाहा कोण आहे ते? title=

मुंबई : Modi Cabinet Expansion: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यावेळी देशातील अनेक राज्यांना मंत्रीपदाच्या रुपाने अनेक नेत्यांना संधी देण्यात आली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. ही निवड झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली. त्याचप्रमाणे आणखी एका नेत्याची चर्चा सुरु झाली आहे. कधी मुलायम सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. ते कोण आहेत, याचीच चर्चा होत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात असे एक नाव आहे, एसपी सिंह बघेल यांचे. (SP Baghel Singh) बघेल यांनी 2019मध्ये भाजपकडून आग्रामधून उमेदवारी मिळवली आणि लोकसभा निवडणूक एकतर्फी जिंकली. एसपी सिंह बघेल याआधी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

राजकारणात येण्याआधी पहले एसपी सिंह बघेल उत्तर प्रदेश पोलीसमध्ये सब-इनिस्पेक्टर पदावर नियुक्त होते. 1989 मध्ये ते मुलायम सिंह यादव ज्यावेळी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात होते. उंच आणि धिप्पाड अशी त्यांची शरीरयष्टी आणि भारदस्त आवाजवाले एसपी अशी त्यांची ओळख. त्यांचा प्रामाणिकपणा, काम करण्याची वेगळी पद्धत यामुळे ते मुलायम सिंह यांना ते चांगेल वाटले. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या यादीत त्यांचा समावेश केला. तेव्हापासून ते मुलायम सिंह यांच्यासोबत असायचे.

1998 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुलायम सिंह यादव यांच्या सांगण्यावरुन एसपी सिंह बघेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. मुलायम यांनी त्यांना जलेसर मतदार संघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चांगला विजय मिळवला. तेव्हापासून ते राजकारणात सक्रीय झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांचा राजकीय आलेख अधिक उंचावत गेला. 

2009मद्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी मायवती यांच्या बहुजन समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि समाजवादी पार्टीविरोधात त्यांनी रान उठवून दिले. 20214 मध्ये त्यांनी समाजवादीविरोधात रामगोपाल यादव यांचा मुलगा अक्षय यादव यांच्याविरोधात निवडणूक लढवली. यावेळी त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी राजकीय हार न मानता आपले काम सुरु ठेवले. त्यानंतर त्यांनी 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. 20217 मध्ये विधानसभा निवडणुकीत टुंडला येथून विजय मिळवला. त्यानंतर ते योगी सरकारमध्ये मंत्री झालेत. 

कोट्यवधी रुपयांची त्यांच्याकडे संपत्ती असल्याची नोंद आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्याकडे 7 कोटी 42 लाख 74 हजार 36 रुपयांची संपत्ती आहे. तर कुटुंबाकडे 44 लाख 25 हजार 295 रुपये आहेत. तसेच स्थावर संपत्ती 6.65 कोटी रुपयांची आहे.