Cabinet Decision : मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, या 17 पिकांवर वाढवली MSP

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jun 8, 2022, 04:54 PM IST
Cabinet Decision : मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, या 17 पिकांवर वाढवली MSP title=

Cabinet Decision on MSP : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने 17 पिकांवर एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी 2 लाख कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे.

कोणत्या पिकांवर एमएसपी वाढवण्यात आला

भात (सामान्य), भात (ए ग्रेड), ज्वारी (हायब्रीड), ज्वारी (मालदांडी), बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल बियाणे, सोयाबीन, तीळ, रामतीळ, कापूस (मध्यम फायबर), कापूस (लांब फायबर) वर एमएसपी वाढवली आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलली : ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत बियाण्यांच्या बाजारीकरणाचा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. आजच्या बैठकीत 14 खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी 50 टक्के अधिक खर्चाचा निर्णय आम्ही सातत्याने पुढे नेला आहे. किसान सन्मान निधी अंतर्गत 2 लाख कोटी रुपये खात्यात गेले आहेत. खतावर 2 लाख 10 हजार कोटींचे अनुदान देण्यात आले आहे.

एमएसपी म्हणजे काय?

किमान आधारभूत किंमत ही किमान किंमत आहे ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्याच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देते ते एमएसपी आहे. 

एमएसपी का ठरवला जातो?

पिकाची एमएसपी निश्चित केली जाते जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी कोणत्याही परिस्थितीत वाजवी किमान किंमत मिळेल.

एमएसपी (MSP) कोण ठरवतो?

रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून दोनदा कृषी खर्च आणि मुल्य आयोगाच्या (CACP) शिफारसीनुसार सरकारकडून किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते. ऊसाची आधारभूत किंमत ऊस आयोग ठरवतो.