मोदी सरकारची महिलांसाठी खूशखबर, घरी बसल्या कमवता येणार पैसा

महिलांसाठी मोदी सरकार लवकरच एक खुशखबरी देणार आहे. केंद्र सरकार लवकरच महिलांसाठी एक योजना बनवत आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 8, 2018, 02:08 PM IST
मोदी सरकारची महिलांसाठी खूशखबर, घरी बसल्या कमवता येणार पैसा title=

नवी दिल्ली : महिलांसाठी मोदी सरकार लवकरच एक खुशखबरी देणार आहे. केंद्र सरकार लवकरच महिलांसाठी एक योजना बनवत आहे.

महिलांसाठी रोजगार

एका हिंदी बेवसाईटने दिलेल्या बातमीनुसार, मोदी सरकारच्या या नव्या योजनेमुळे महिला घरी बसल्याच काम करु शकता आणि चांगले पैशे कमवू शकता. सरकार बीपीओच्या अंतर्गत महिलांसाठी रोजगार आणणार आहे. या योजनेबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

छोट्य़ा शहरांमध्ये उद्योगांचा विस्तार

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना विभागाला एक अशी स्कीम तयार करण्यासाठी सांगितली होती ज्यामुळे महिलांना घरी बसल्या काम करता येईल आणि पैशे कमवता येईल. सरकार बीपीओ प्रमोशन स्कीमअंतर्गत उद्योग छोट्या शहरांपर्यंत देखील पोहोचवण्याचा विचार करत आहे. सध्या देशात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. पण सरकार य़ाचा विस्तार छोट्या शहरांमध्ये देखील करण्याचा विचार करत आहे.